मांगूर : येथील दुधगंगा नदीमध्ये मांगूर-कुन्नूर दरम्यानच्या जुन्या पुलाजवळ शनिवारी (ता. 30) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना अंदाजे चारफुटी मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

गेल्या काही दिवसापासून दूधगंगा, वेदगंगा पट्ट्यातील मांगूर, बारवाड, कुन्नूर, भोज परिसरात मोठ्या प्रमाणात मगरीचा वावर दिसून येत आहे. आठवडाभरापूर्वीच गजबरवाडी येथे मगरीचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज, शनिवारी पुन्हा दूधगंगा नदीजवळच मगरीचे दर्शन झाले. जनावरे व कपडे धुण्यासाठी ग्रामस्थ जातात, त्या ठिकाणीच मगरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

हेही वाचा: दीपक नायट्रेटचे शेअर्स 25 टक्क्यांनी घसरले, शेअर्स घेण्याची नामी संधी ?

त्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामस्थ, महिला व शेतकरीवर्गांला मगरीपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मांगूर येथे नदीमध्ये मगर निदर्शनास आल्यानंतर तात्काळ ग्रामपंचायतीमार्फत वन विभागाचे अधिकारी पी. बी. गोकाक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वन विभागाचे गार्ड गिरीश पाटील यांना पाठवून दिले. मगर निदर्शनास आलेल्या ठिकाणाची पाहणी करून लवकरात लवकर पकडण्यासाठी उपाय योजना राबवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here