मुंबई : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा (rajesh sharma complaints) यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे तक्रार केली आहे. अंधेरी येथील चिनाय आणि एमव्हीएलव्ही या महाविद्यालयवर (MVLU college) प्रशासक नेमून ती सुरळीत सुरू ठेवण्याची त्यांच्याकडे मागणी केली मात्र आपल्याला दाद मिळत नसल्याने आपण शिक्षण मंत्र्यांच्या विरेाधात राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केल्याचे शर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा: बंदर व गोदी कामगारांना १२ हजार रुपये बोनस मिळणार

काँग्रेसच्या एका वरिष्ठ आणि प्रदेश सरचिटणीस पदी असलेल्या शर्मा यांच्या या तक्रारीमुळे गायकवाड यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता काँग्रेसच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अंधेरी येथील चिनाय आणि एमव्हीएलयू महाविद्यालय हे अत्यंत महत्वाचे असून परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळते, परंतु हे महाविद्यालय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनानी घातला असून त्यासाठी न्यायालयानेही आदेश दिलेले आहेत.

सोनिया गांधी यांना पत्र

सोनिया गांधी यांना पत्र

मात्र शिक्षण विभागातील अधिकारी व्यवस्थापनासोबत संगनमत करून हे महाविदृयालय बंद पाडण्यासाठी काम करत असल्याने त्यावर प्रशासक नेमला जावा अशी मागणी केली असता, त्यावर काँग्रेसच्या नेत्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी शर्मा यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

राजेश शर्मा

राजेश शर्मा

चिनाय आणि एमव्हीएलयू ही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये अनुदानित महाविद्यालये असून या ठिकाणी ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची क्षमता आहे. येथे सुमोर १५० शिक्षक, कर्मचारी आदीं कार्यरत असून हे महाविद्यालय बंद करून येथे असलेली जागा खासगी बिल्डराच्या घश्यात घातली जाणार आहे. यामुळे ही महाविद्यालये वाचविण्यासाठी आपण वेळोवेळी वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी केली असता त्याला प्रतिसाद मिळाला नसल्यानेच आपण शेवटी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून याविषयी तक्रार केली असल्याचे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी सांगितले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here