नाशिक : दिवाळी दोन दिवसांवर आल्याने शनिवारी बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. कपडे, फराळाचे पदार्थ, फटाके -पिस्तुल, आकाश कंदिल, गृह सजावट साहित्य, सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी गर्दी झाली आहे. मेनरोडकडे जाणारे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. रविवार कारंजा, शालिमार, टिळक रोड येथे बॅरीकेट लावले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. esakal

कोरोनाची घटती रूग्ण संख्या आणि दिवाळीच्या निमीत्ताने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाल आहे.
खरेदीसाठी नागरिक बाजारात गर्दी करत आहेत.
बाजार गर्दी होउन देखील नागरिकांकडून कोरोना नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
सणानिमीत्त कपडे खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
विविध आकार आणि रंगाच्या पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
फटाक्यांच्या बंदुकांसाठी लहानमुले पालकांजवळ हट्ट धरत आहेत.
रविवार कारंजा, शालिमार, टिळक रोड येथे बॅरीकेट लावले आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here