पुणे : बालेवाडीतील पाटील नगर येथे शनिवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत 8 जण जखमी झाले आहेत. कोणत्याही प्रकारची जिवीत हानी नाही. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानानी जखमीना बाहेर काढत रुग्णालयात हलविले.

बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातील दोन इमारतीना जोडणाऱ्या पार्किंग पोडियमचा स्लॅब टाकण्याचे काम रात्रीच्या सुमारास सुरु होते. रात्री 12 वाजता स्लॅब कोसळला. याबाबतची माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाल मिळाली. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड, एमआयडीसी व पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनेच्या ठिकाणी दाखल झाल्या.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना

हेही वाचा: वाकुर्डे पूर्ण होईल अन् विरोधकांचे तुणतुणे बंद; मानसिंगराव नाईक

जवानांनी स्लॅबच्या कांक्रीटमध्ये अडकलेल्या 12 कामगाराना तत्काळ बाहेर काढले. त्यानंतर 8 जखमी कामगाराना वाकड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पीएमआरडीचे मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे, नांदेड़ अग्निशामक दलाचे अधिकारी सुजीत पाटील यांच्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, एमआयडीसीच्या पथकानी कार्यवाही केली.

….म्हणून जिवीत हानी झाली नाही !

पार्किंग पोडियमचा स्लॅब असल्याने ते जमीनीपासून काही अंतरावर होते. तसेच स्लॅबसाठी आवश्यक पाणी, सिमेंट, खडी, वालू यांचे योग्य प्रमाण घेण्यात आले होते. तसेच संबंधित ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टिने आवश्यक उपायउयोजना घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे जिवीत हानी झाली नाही, असे अग्निशामक अधिकारी सुजीत पाटील यांनी सांगितले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here