बंगळुरू: कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांच्या वडिलांच्या समाधी शेजारीच पुनीतचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि कुटुंबीयांनी घेतला.अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर आज सकाळी बंगळुरूच्या कांतीरवा स्टुडिओ परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुनीतची पत्नी अश्विनी यांच्याकडे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.सीएम बसवराज बोम्मई यांनी कांतीरवा स्टुडिओ (Kanteerava Studio) परिसरात पुनीतच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.अभिनेता पुनीतच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कुटुंबीयांसह चित्रपटसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते आणि चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.शांततेत, सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात मदत केल्याबद्दल अभिनेता सुदीपनं सरकार आणि अधिकाऱ्यांचं आभार मानले आहेत.शुक्रवारी पुनित यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सोद यांनी पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल दु:ख व्यक्त केलंय.पुनीत यांना छातीत दुखत असल्यामुळे बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली होती. सध्या टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही पुनीत यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.