अलीकडेच मलायकाने नवे फोटोशूट केले आहे. यावेळी मलायका हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. मलायकाने एमराल्ड ग्रीन पँट सूट घातला आहे. तिने आणि तान्या घावरीने या आउटफिटमधील अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात मलायका वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहे.
मलायका हिरव्या रंगाच्या लांब ब्लेझरमध्ये आहे. यासोबत तिने हाय वेस्टेड पँटही घातली आहे. ब्लेझरला मोठे खिसे आणि चंकी ब्लॅक बटन्स आहेत. फ्लेर्ड पॅंटमध्ये तिची स्टाइल आणखीनच आकर्षक दिसते.
मलायकाने हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. तिच्या हातात राऊंड मस्टर्ड आकाराची बॅगही आहे. मेकअपबद्दल बोलायचे झाले, तर मॅचिंग ग्रीन आय शॅडो लावला आहे. यासोबत तिने मस्कारा आणि गुलाबी लिपस्टिकने तिचा मेकअप पूर्ण केला आहे.
मलायकाचा हा ड्रेस खूपच महागडा आहे. जूडी झांगच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तो खरेदी करू शकता. मलायकाच्या हाय व्हेस्ट ट्राउझर्सची किंमत सुमारे 33 हजार आहे, तर या क्लासिक ब्लेझरची किंमत सुमारे 45 हजार आहे.
मलायकाच्याृ आउटफिटला चाहत्यांकडून ग्रीन सिग्नलही मिळाला आहे. तिची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. सहसा मलायका तिच्या आउटफिट्समध्ये कोणतेही मोठे प्रयोग करत नाही, परंतु ती नेहमीच वेगवेगळ्या स्टायलिश पोशाखांना घेऊन उत्साहित असते.
कामाच्या बाबतीत, ती काही काळापासून छोट्या पडद्याशी जोडली गेली आहे आणि काही शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसते. सुपरमॉडेल ऑफ द इयर सीझन 2 मध्येही ती जज म्हणून दिसली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here