कोकणात सुगीची लगबग सुरू असून सर्वत्र भात कापणीची शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कोकणात पारंपरिक शेतीत आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तांत्रिक शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोकणातील मंडणगड तालुक्यात शेतीच्या कामांचा छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला आढावा.

टपोर्‍या भरलेल्या लोंब्या उभ्या भाताच्या पातीसह वाकल्या आणि दाण्यांसह पानंही सोन्यागत पिवळी पडायला लागली, म्हणजे समजायचे की आता भात काढणीला आले आहे.

कोकणात सर्वत्र भातकापणीला सुरुवात झाली आहे. भातकापणी म्हणजे भाताची रोपं अगदी मुळालगत कापून उन्हात सुकत ठेवायची.

शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असून यंत्राद्वारे कापणी करण्यात येत आहे.
संपूर्ण शेत कापून झाले की त्याचे भारे बांधून खळ्यावर नाहीतर घरातील अंगणात आणून ठेवले जातात.
भौगोलिक परिस्थिती डोंगराळ असल्याने भाताची वाहतूक बोजा बांधून डोक्यावरून केली जाते.
भाऱ्यात बांधून आणलेला भात एकत्रित एकावर एक डाळून ठेवला जातो. त्याला ग्रामीण भाषेत भाताची उडवी असे म्हणतात.
शेतात भाताच्या व्हळ्या घालून अशा पद्धतीने त्या पेंढीने बांधून ठेवल्या जातात. कारण रात्रीच्या वेळेत जनावरांनीही त्याची नासधुस करु नये.

शेतात भात झोडणीसाठी खळे तयार करताना शेतकरी

भात कापून घरी आणल्यानंतर मोकळी झालेली शेताडी.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here