नाशिक रोड : भारतीय सैन्याने (Indian Army) १९७१ मध्ये पाकिस्तानसोबत (Pakistan) झालेल्या युद्धात (War) अतुलनीय शौर्याच्या जोरावर मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्त दिल्ली येथून निघालेली विजय ज्योतीचे राष्ट्रीय एकता दिनी नाशिक रोड येथील तोफखाना केंद्रात आगमन झाले आहे. ही विजय ज्योत नाशिकला ९ नोव्हेंबरपर्यंत राहणार असून, यानिमित्त नाशिक शहरात तोफखाना केंद्रातर्फे विविध कार्यक्रमाचे होणार असल्याची माहिती तोफखाना केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.
युद्धात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या सैनिकांना आदरांजली
१९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते. या घटनेला २०२१ मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहे. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या आणि परमवीरचक्र, महावीरचक्र विजेत्या सैनिकांच्या गावीदेखील ही विजय ज्योत घेऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या गावची माती राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आणणार आहेत. ९ नोव्हेंबरला विजय ज्योत नाशिकहून महू (मध्य प्रदेश) येथे रवाना होणार आहे.
हेही वाचा: नीरज चोप्राला मिळाली Mahindra XUV700; महिंद्रांनी पाळला शब्द

विजय ज्योतीचे राष्ट्रीय एकता दिनी नाशिक रोड येथील तोफखाना केंद्रात आगमन झाले असून नाशिक शहरात तोफखाना केंद्रातर्फे विविध कार्यक्रमाचे होणार असल्याची माहिती तोफखाना केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.
असे आहेत कार्यक्रम
विजय ज्योतीचे तोफखाना केंद्राच्या अशोक चक्र गेटवर खास लष्करी थाटात स्वागत झाल्यानंतर १ नोव्हेंबरला विजय ज्योत देवळाली एअर फोर्स स्टेशन, आणि नाशिक रोडच्या कॉम्ब्कट आर्मी एव्हिएशन स्कूलला भेट, २ नोव्हेंबरला तोफखाना केंद्र ते पांडव लेणी या दरम्यान तोफखाना केंद्रातील जवानांची सकाळी सायकल रॅली काढण्यात येईल. त्यांनतर सकाळी १०. ३० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान विजय ज्योत ओझरला एअरपोर्टला भेट देईल. सायकल रॅली गांधीनगरपासून सुरू होईल. ३ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी २ वेळेत विजय ज्योतीसह सिटी मार्च होईल. ४ ला विजय ज्योत भोसला मिलिटरी स्कूलमध्ये, ५ ला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत विजय ज्योत नाशिकमधील पोलिस प्रशिक्षण अकादमीला भेट देईल. ६ नोव्हेंबरला विजय ज्योत देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीला भेट देईल. येथे १९७१ च्या युद्धातील सहभागी जवान, त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाईल. ७ ला १९७१ च्या युद्धात सहभागी जवान, कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली जाईल. ८ ला तोफखाना केंद्र नाशिक रोड येथे सकाळी ९ वाजता वॉर मेमोरिअल येथे १९७१ च्या युद्धातील सहभागी जवान, कुटुंबीयांच्या उपस्थितीत या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
हेही वाचा: ‘जनरल’ डब्याचा नियम बदलणार?
Esakal