भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीपूर्वी सोशल मीडियावर एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. या फोटोत कर्णधार विराट कोहली-अनुष्का आणि उप कर्णधार रोहित-रितिका ही जोडी एका फ्रेमध्ये दिसलीये. एवढेच नाही या स्वीट कपलच्यामध्ये अश्विनची पत्नी प्रिथी देखील दिसते आहे. ही सर्व मंडळी चिलर पार्टीसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना पाहायला मिळते.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघातील अनेक खेळाडूंनी कुटुंबियांसह हॅलोवीन पार्टीचा आनंद घेतला. परदेशात 31 ऑक्टोबर दिवस ‘भूतांचा’ दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे पितृपक्ष प्रकार असतो त्याप्रमाणेच अनेक पाश्चिमात्य देशात ‘हॅलोविन नाइट’ साजरी केली जाते. या दिवशी भूतांचे कपडे परिधान करून आनंद साजरा करण्याची पद्धत आहे. मोठ्या व्यक्तिंप्रमाणे लहान मुलंदेखील मोठ्या संख्येनं ‘हॉलोविन नाइट’मध्ये सहभागी होतात. क्रिकेटर्सनी आपापल्या पत्नी आणि मुलांसह या दिवसाचे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

अनुष्काने आपली मुलगी वामिका आणि अन्य क्रिकेटर्सच्या कुटुंबियासोबत नाईट पार्टीचे काही फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केले आहेत. या फोटोत विराट अनुष्कासह चिमुकली वामिका, रोहित शर्मा आणि रितिका सजदेहसह त्यांची मुलगी समायरा आणि अश्विनची पत्नी प्रिथी आपल्या मुलीसह दिसते. रोहित शर्माची पत्नी रितिका आणि अनुष्का या दोघींना एका फ्रेममध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
हेही वाचा: INDvsNZ : भारत-न्यूझीलंड संघाविरुद्ध हरला तर…
विराट आणि रोहित यांच्या वादाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर कोण कुणाला फॉलो करते आणि कोण नाही यासंदर्भात चर्चा रंगली होती. इन्स्टाग्रामवर विराट कोहली रोहितला फॉलो करत असला तरी रोहितच्या यादीत विराट नाही. याशिवाय रोहितची पत्नी रितिकाही विराट किंवा अनुष्काला फॉलो करत नसल्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती. अनुष्काही उपकर्णधार आणि त्याच्या पत्नीला फॉलो करत नसल्यामुळे या दोघींमध्ये दूरावा असल्याच्या चर्चाही यापूर्वी रंगल्या आहेत.
Esakal