आज जगभरात सर्वत्र हॅलोवीन साजरा केला जात आहे. भारतात तो कमी- अधिक प्रमाणात साजरा होतो. पण अनेक सेलिब्रिटी तो साजरा करतात.अनुष्का शर्मा, विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आदी क्रिकेटपटूंनी दुबईत आपल्या मुलांसह पार्टी केली. भुताच्या चित्रविचित्र अवतारात सारा अली खान, कुणाल खेमू, नेहा धुपिया, अंगद बेदी पार्टी करायला एकत्र जमले, मौनी रॉयनेही हॅलोवीन सेलिब्रेट केला. तर बच्चेकंपनीनी मजा केली. तैमुर अशाप्रकारे हॅलोविन सेलिब्रेट करत असल्याचा फोटो करिनाने सोशल मिडियावर शेअर केला. एकंदरीत सर्व कलाकारांमध्ये हॅलोविन साजरा करण्यासाठी उत्साह दिसून आला.