महाबळेश्वर (सातारा) : जिल्हा परिषदेसह (Zilla Parishad) जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका नगरपंचायती यांच्या निवडणूका धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिवसेना स्वबळावर लढविणार असून, शिवसैनिकांनी (Shivsena) आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी येथे केले.
वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसंवाद मेळावा येथे आयोजिण्यात आला होता. या वेळी श्री. सामंत बोलत होते. याप्रसंगी सातारा व सांगली संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे- पाटील (Nitin Bangude-Patil), माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर आदी उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले,‘‘ येत्या निवडणुकांमध्ये आपण सांघिक कामगिरी करावी लागेल. गटतट बाजूला सारून भगवा फडकविण्यासाठी एकत्र यावे लागेल. लोकहिताची कामे तळागाळापर्यंत पोचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची असून, आपण केलेल्या कामाची प्रसिद्धी करीत नाही. त्यामुळे आपल्या कामांचे श्रेय दुसराच घेऊन जातो. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नाव व विचार तळागाळात पोचविणाऱ्या शिवसैनिकाला पक्षाच्यावतीने उमेदवारी दिली जाईल. हार तुरे घेऊन मागे पुढे करणाऱ्या तसेच स्ट्रॉबेरी घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याला तिकिट दिले जाणार नाही.’’
हेही वाचा: ठरलं! उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादी देणार तगडा उमेदवार

उदय सामंत
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची पहिली शाखा महाबळेश्वर येथे स्थापन झाली होती, असे सांगून प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले,‘‘ स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही महाबळेश्वरवर नितांत प्रेम असल्याने त्यांनी महाबळेश्वर शहरासह तालुक्याच्या विकासासाठी ३०० कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा निधी दिला आहे. आता महाबळेश्वर बरोबरच संपूर्ण जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे.’’
हेही वाचा: काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का; ‘शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार’
या वेळी माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांची नुकतीच जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याने त्यांचाही सत्कार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. युवासेनेचे तालुकाप्रमुख नितीन भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश कुंभारदरे यांनी आभार मानले. या वेळी महिला आघाडी जिल्हासंघटक शारदा जाधव, नंदकुमार घाडगे, एस.एस.पार्टे, सचिन मोहिते, एकनाथ ओंबळे, आनंद उतेकर, नगरसेवक संजय पिसाळ, विमलताई ओंबळे, तालुकाप्रमुख संतोष जाधव, संजय शेलार, लीलाताई शिंदे, राजश्री भिसे, वनिता जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे, सुनील साळुंखे, शहरप्रमुख महेश गुजर, विशाल सपकाळ, उमेश गुरव, जी.के आंब्राळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Political : फार्म हाऊसवर ठरला ‘मास्टर प्लान’; भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांत खलबत्तं
Esakal