एकेकाळी दूध, दही, लोणी खाणारा माणूस खाते-पिते घरका आहे असं लोक म्हणायचे. दही खाण्याशिवाय तर अनेकांचा दिवसच पूर्ण होत नाही. पण गेल्या काही वर्षात विराट कोहली, सोनम कपूर, अनुष्का शर्मा या सेलिब्रिटींनी वेगन डाएट सुरू केल्याने अनेकांनी हे डाएट सुरू केले आहे. त्यांना पाहून जर तुम्ही वेगन व्हायचा विचार करत असाल तर गायी, म्हशीचे दूध पिणे तुम्हाला सोडावे लागेल. कारणही तसेच आहे.

गाईचे दूध
कारण गायीपासून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी तिला खाण्यासाठी आणि पिण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं दिल जात नाही. उलट चाराच जास्त दिला जातो. तो चारा उगवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी वापरण्यात येतं. त्यामुळे पर्यायाने पर्यावरणाची हानी होते. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे पदार्थ वेगन डाएटमध्ये वर्ज केले जातात. तसेच प्राण्यांचे मांस आणि दूधापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. म्हणजेच या वेगन डाएटचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे, जर तुम्ही तुमच्या डाएटमधून मांस, दूध आणि अंडी पूर्णपणे काढून टाकणे गरजेचे आहे. मात्र, तुम्हाला त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी डाएटमध्ये फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स यांसारख्या पदार्थांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

soya-milk.jpg
दूधाला पर्याय काय- ज्यांना दूध पनीर दही असे प्राणीजन्य प्रोटीन पदार्थ खाणे-पिणे आवडते त्यांना आहारात मोठा बदल करावा लागतो. दूध म्हणून बदामाचं दूध, सोया मिल्क प्यायले जाते, काही फक्त सुकामेवा भरपूर खातात. त्यामुळे हे डाएट करताना आपली आर्थिक कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

शाकाहारी आहाराचा प्रकार
– व्होल व्हीट वेगन डाएट- यामध्ये फळं भाज्या, डाळं ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश केला जातो.
– रॉ फूड वेगन डाएट- कच्ची फळे, भाज्या, ड्रायफ्रुट्स तसेच वनस्पतींपासून तयार केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो.
– थ्राइव डाएट- व्होल व्हीट आणि रॉ फूड या दोन्ही पदार्थांचा समावेश यात केला जातो.

हे आहेत फायदे
-मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे मिळतात.
-वजन कमी होते
-शरीरातील साखरेवर नियंत्रण राहते
-शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होते.
-किडनीचे कार्य सुरळीत चालू राहते.
Esakal