आजकाल प्रत्येकजण आपापल्या घराची साफसफाई करण्यात व्यस्त असतो. याचे कारण म्हणजे दिवाळीचा सण. अशा स्थितीत घराची साफसफाई करताना अनेकवेळा तुम्हाला घराच्या कोपऱ्यात पाल लपलेली दिसेल. काही लोक पालीला इतके घाबरतात की, ते पाहताच ओरडतात. जर तुम्हालाही पाल पाहून भीती वाटत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही पालीला घरापासून दूर करू शकता. जाणून घ्या कोणते आहेत हे सोपे घरगुती उपाय.

अंड्याचे कवच:
पालीपासून दूर होण्याचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे अंड्याचे कवच आहे. जर तुमच्या घरी पाल वारंवार येत असेल तर तुम्ही लगेच या पद्धतीचा वापर करून त्यातून सुटका करा. यासाठी तुम्ही फक्त अंडी फोडा आणि त्याची साल फेकण्याऐवजी ते त्या ठिकाणी ठेवा जिथे जास्त पाल तुमच्या घरात येण्याची शक्यता आहे. पाल अंड्याच्या वासापासून दूर पळते.
कॉफी पावडर:
पाल घरातून हाकलण्यासाठी कॉफी पावडर आणि कॅचूची रेसिपी देखील प्रभावी आहे. यासाठी फक्त कॉफी पावडर आणि कॅचूचे लिक्वीड तयार करा. हे लिक्वीड स्प्रे बाटलीत भरा. ज्या घरातून पाल येण्याची भीती वाटत असेल त्या घराच्या खिडक्या आणि दरवाजांवर हे लिक्वीड फवारावे. त्याच्या वासाने पाल मारेल किंवा पळून जाईल.
लसूण:
पाल लसणाचा वास सहन करू शकत नाहीत. ती त्याच्या वासापासून दूर पळते. म्हणून, लसणाच्या काही पाकळ्या लटकवा जेथे तुम्हाला घरामध्ये पाल येण्याची शक्यता असते.
डांबर गोळी (नेप्थलीन बॉल्स):
घरातून पाल काढून टाकण्यासाठी डांबर गोळी (नेफ्थलीन बॉल्स) देखील एक चांगला मार्ग आहे. त्यामुळे पालही घरातून पळून जातात.
थंड पाणी:
घरातून पाल घालवण्यासाठी थंड पाणी ही एक सोपी ट्रिक्स आहे. पाल दिसल्यावर त्यावर थंड पाणी टाका. यामुळे पाल पळून जाईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here