सिरॅमिक आणि काचेच्या भांड्यांव्यतिरिक्त लाकडी भांडीही आपल्या घरात वापरली जातात. लाकडाच्या भांड्यांमध्ये अन्न तयार केले जात नसले तरी त्यातून अन्न नक्कीच वाढले जाते. इतर भांडी प्रमाणे लाकडी भांडी फक्त धुऊन पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. त्यांची साफसफाई करणेही सोपे नसते. ते भांडी नीट साफ न केल्यास त्यावर धूळ साचू लागते, त्यामुळे त्यांची चमक हळूहळू निघून जाते आणि त्यातून दुर्गंधीही येते. त्यामुळे ही भांडी व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. या घरगुती टिप्सचा वापर करून तुम्ही लाकडी भांडी सहज स्वच्छ करू शकता आणि त्याचा वासही निघून जाईल.

मीठ:
लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी मीठ प्रभावी ठरते. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात तीन ते चार चमचे मीठ मिसळा. त्यानंतर काही वेळ लाकडी भांडी या पाण्यात सोडा. 10 मिनिटांनंतर हे भांडे बाहेर काढा आणि सुती कापडाने पुसून टाका.
व्हिनेगर:
लाकडी भांडी साफ करण्यासाठी व्हिनेगर देखील खूप उपयुक्त आहे. यासाठी एका भांड्यात व्हिनेगर मिसळा. आता त्यात एक चमचा मध टाका. नंतर मोठा कापूस घ्या आणि या द्रावणात मिसळा आणि पिळून घ्या. पिळल्यानंतर भांडी कापसाने घासून स्वच्छ करा. असे दोन ते तीन वेळा केल्याने भांड्यांचा वास निघून जाईल आणि भांडीही स्वच्छ होतील.
लिंबू:
लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस खूप प्रभावी आहे. यासाठी एका लिंबाच्या रसात कोमट पाणी मिसळा. यानंतर, या पाण्यात खराब आणि दुर्गंधीयुक्त लाकडी भांडी घाला आणि 10-15 पर्यंत ठेवा. नंतर ही भांडी बाहेर काढा आणि सुती कापडाने पुसून टाका.
बेकिंग सोडा:
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस नीट मिक्स करून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट लाकडी भांड्यांवर लावा आणि काही वेळ राहू द्या. ते सुकल्यावर हे भांडे कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा. याने लाकडी भांडी लवकर साफ होतात आणि तुमची भांडीही चमकू लागतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here