भारतीय पौराणिक कथांमध्ये अन्नाला खूप पवित्र मानले गेले आहे. भारतीय सण आणि उत्सवांमध्ये अन्न हा अविभाज्य घटक आहे. अन्नाचा संबंध देव-देवतांशी जोडला जातो. आज आम्ही अशा खाद्यपदार्थांची यादी तुमच्यासमोर आणणार आहोत, ज्यांचा उल्लेख भारतीय पौराणिक कथांमध्ये आढळतो. हनुमानाने फळ समजून सुर्य गिळलं. शबरीनं प्रभू श्रीरामांना बोरं खायला दिली इत्यादी याची उदाहरण आहेत. भारतीय पौराणिक कथा आणि अन्न यांचा संबंध जवळचा आहे. आपल्या संस्कृतीवर प्रभाव टाकणाऱ्या काही पदार्थांची यादी खालीलप्रमाणे-

जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला अर्पण केला जाणारा हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. कृष्ण लहानपणी लोणी चोरून खायचा म्हणूनच त्याला ‘माखन चोर’ म्हणूनही ओळखले जाते.

तुम्ही रामायणातील ही लोककथा ऐकली असेल जिथे प्रभू श्रीरामचंद्राची निस्सीम भक्त असलेल्या शबरीने प्रभू रामचंद्रांना बोरं खायला दिली होती.

मध ही अशी गोष्ट आहे जी सर्वांना माहिती आहे. पण त्याचा पौराणिक कथांतील उल्लेख अनेकांना माहीत नसेल. दुर्गा सप्तशतीमध्ये महिषासुर वधाचे वर्णन करणारा एक अध्याय आहे आणि तेथे असे लिहिले आहे की, देवी दुर्गा महिषासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी मध पितात. तिथे उल्लेख आहे की, महिषासूराचा वध करेपर्यंत दुर्गामाता रौद्र रूप धारण करेल. एकदा का महिषासूराचा वध केला की देवी मध प्राशन करते आणि पुन्हा आपल्या मुळ रुपात परत येते

हे पेय महाशिवरात्री या लोकप्रिय सणाशी संबंधित आहे. बहुतेक श्री महादेवाचे भक्त या प्रसंगी थंडाई पितात. असे मानले जाते की, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवाने त्यांचा घसा शांत करण्यासाठी थंडाई प्यायली होती.

ही एक अतिशय लोकप्रिय मिष्टान्न आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान मोदक केले जातात, कारण गणपतीला माता पार्वतीने बनवलेले हे मिष्टान्न खूप आवडत होते.
Esakal