मुंबई – भारताचा पाकिस्ताननं दारुण पराभव केल्यानंतर काल झालेल्या न्युझीलंडच्या विरोधातही भारतला हार पत्करावी लागली. याचे पडसाद सोशल मीडियावरही जोरदारपणे उमटल्याचे दिसून आले. त्यामध्ये अनेक बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी भारतीय खेळाडूंच्या प्रती नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर याचाही समावेश आहे. त्यानं भारतीय खेळाडूंच्या पराभवावर आपली सहानुभूती व्यक्त केली आहे. त्याची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आले आहे. आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या विरोधातही पराभव झाला आणि आता न्युझीलंडच्या विरोधातही यामुळे असंख्य चाहते भारतावर नाराज झाले आहेत.

त्यानं त्याविषयी इंस्टावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, हारणारी लोकं कधी कुणाला आवडत नसतात. भारत जेव्हा एखादी मॅच हारतो तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटते. दुसरीकडे त्यानं भारताच्या खेळांडूच्या प्रती सहानुभूतीही व्यक्त केली आहे. आपले खेळाडू जेव्हा एखादा सामना हरतात तेव्हा आपण लगेचच त्यांना दोष देतो मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी आपले मनोरंजन केले आहे हे आपण विसरतो. हे चूकीचे आहे. त्यामुळे चाहत्यांना अर्जुन नाराज आहे की भारतीय खेळांडूंच्या पराभवाचे समर्थन करतो आहे हे कळनासे झाले आहे. तशा त्याला प्रतिक्रियाही आल्या आहेत.
लोकहो याचा विसर पडू देऊ नका की, हेच ते खेळाडू आहे ज्यांनी आपले मनोरंजन केले आहे. जगातील सर्वोत्कृष्ठ खेळांडूंमध्ये आपल्या खेळांडूंचा समावेश आहे. त्यामुळे आपण त्यांना एखाद दुसऱ्या पराभवानं नाव ठेवू नये. आपण त्यांना आणखी एक संधी द्यायला हवी. हरणं कुणालाच आवडत नाही. प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळते. आपण त्या हरण्यातूनच काही गोष्टी शिकत असतो. त्यामुळे या पराभवातून देखील टीम इंडिया उसळी घेईल. असा आशावाद अर्जुननं व्यक्त केला आहे. अर्जुनच्या आगामी वर्कफ्रंटची गोष्ट करायची झाल्यास तो, अजय बहलव्दारा दिग्दर्शित एका सस्पेंस थ्रिलरमध्ये दिसणार आहे. त्या चित्रपटाचे नाव द लेडी किलर असे आहे.
हे देखील वाचा: अर्जुन कपूरने खरेदी केली आणखी एक महागडी कार
हे देखील वाचा: आर्यन खानला वाचविण्यात सरकारला रस ; विनायक मेटे
Esakal