दिवाळी म्हटलं झगमगते दिवे, दारावर लावलेले आकाशकंदील, फटाके असे दृश्य डोळ्यांसमोर येते. पण उत्साह आणि जल्लोषच्या वातावरणात आपण आपल्या आरोग्याकडे, सुरक्षिततेकडे आणि पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करतो. दिवाळी साजरी करताना आपल्याला आसपासच्या लोकांचा विरस पडू नये. दिवाळीतील फराळ खाताना आपल्या आरोग्याचाही विचार केला पाहिजे. दिवे लावताना सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. दिवाळी साजरी करताना आपल्यामुळे निर्सगाला हानी पोहचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत साजरी करा दिवाळी
– साधनांपेक्षा माणसांना जवळ करा. सणाच्या निमित्ताने घरच्यांना, स्नेहीजनांना वेळ द्या. त्यांच्या सहवासात राहा. दिवाळी दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. मनातील सारे द्वेष-क्लेश मिटून आपल्या अंतरातील प्रेमाचे, आनंदाचे दीप उजळत राहतील, याची दक्षता घ्या!
– घरातील सर्व जण मिळून…फराळ, आकाशकंदील बनवणे, पणत्या रंगवणे, रांगोळी काढणे अशा गोष्टींत सामील व्हा.
– दिवाळीच्या निमित्ताने घरादाराचा कोपरा न् कोपरा स्वच्छ केला जातो.
– ज्या वस्तू लागत नाहीत, निरुपयोगी आहेत, त्या टाकून द्या किंवा कुणा गरजूला वापरायला द्या
– सणाच्या नावाखाली संसाधनांची उधळपट्टी नि अनावश्यक खरेदी टाळा.

कोरोनामधील दिवाळी साजरी करताना हे विसरू नका.
-दिवाळीत आपण आप्त-मित्रांना भेटतो तेव्हा योग्य अंतर राखून भेटा. मास्क जरूर वापरा.
– हाताला सॅनिटायझर लावून फटाके उडवू नका. सॅनिटायझरची बाटली आगीपासून लांब ठेवा.

दिवाळी फराळ
दिवाळीमध्ये आरोग्याची अशी घ्या काळजी
– दिवाळीत रोज व्हिटॅमिन-सी मिळेल, असे पदार्थ खा.
– फळे-भाज्या भरपूर प्रमाणात खा आणि तुमची इम्युनिटी कायम ठेवा.
– बाहेरचे खाणे टाळा. घरीच ताजे-पौष्टिक पदार्थ तयार करा.

पर्यावरणपूरक दिवाळी करा साजरी
-आवाज करणारे फटाके उडवू नका. प्रदूषणमुक्त वापरू शकता.
– भेटवस्तू देताना झाडे, प्लॅन्टर्स अशा वस्तू द्या.
– इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावा.
– गॅझेट फ्री दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करा.
Esakal