बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तिनं कारकिर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले. २ दशकांपेक्षा जास्त काळापासून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

ऐश्वर्याचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी कर्नाटकात झाला. तिने कमी वयातच जाहिराती करायला सुरुवात केली होती. त्यावेळी ती ९ वीत होती. तिनं कॅमलिन पेन्सिलची अ‍ॅड केली होती.
तिनं १९९३ मध्ये आमिर खानसोबत पेप्सीची अ‍ॅड केली आणि प्रसिद्धीझोतात आली. सामान्यतः असे दिसून येते की मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर चित्रपटांच्या ऑफर्स येतात. पण ऐश्वर्याच्या बाबतीत याउलट होतं. ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनण्यापूर्वीच तिला तिला काही चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या.
वोगला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना ऐश्वर्याने सांगितले की , मिस वर्ल्ड होण्यापूर्वी मला ४ चित्रपटांच्या ऑफर होत्या. काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्यासाठीच मी मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. १९९६ मध्ये मी मिस इंडियामध्ये भाग घेतला नसता तर माझा पहिला चित्रपट राजा हिंदुस्तानी ठरला असता.
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी ऐश्वर्या अभ्यासात चांगली होती. तिला मेडिसिन लाइनमध्ये करिअर करायचे होते. प्राणीशास्त्र हा तिचा आवडता विषय होता. पण तिने आर्किटेक्चरचा अभ्यास केला.
ऐश्वर्याने जगभरात भारताचं नाव उंचावले. जागतिक व्यासपीठावर तिच्या उपस्थितीने सर्वांची मने जिंकली आणि संपूर्ण जग तिचे चाहते झाले. २००३ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीमध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. त्याचबरोबर तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यानंतर ऐश्वर्या ही दुसरी भारतीय सेलिब्रिटी ठरली जिचा मादाम तुसादमध्ये पुतळा आहे. तिनं अनेक परदेशी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे.
ऐश्वर्याने १९९७ मध्ये साऊथ चित्रपट इरुवरमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याच वर्षी ऐश्वर्याने बॉबी देओलसोबत ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
तिने मोहब्बतें, ताल, मेला, जोश, हम तुम्हारे हैं सनम, देवदास, रेनकोट, धूम २, गुरू, सरकार राज यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आता ती दाक्षिणात्य चित्रपट पोन्नियिन सेल्वन १ मध्ये दिसणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here