स्वतंत्र विचारसरणी असणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र्य असणाऱ्या स्त्रिया या बलवान असतात. त्या त्यांच्या आयुष्यातील अडथळ्यांना अत्यंत संयमाने आणि प्रगल्भपणे सामोऱ्या जातात. अडचणींवर मात कशी करायची हे या स्रियांना चांगले माहिती असते. अत्यंत खंबीर अश्या या स्त्रिया असतात. कितीही खंबीर असल्या तरी त्यांना प्रेमाची, आधाराची गरज असतेच. वरवर पाहता त्यांच्याकडे बघून यांना प्रेमाची गरज आहे का असे वाटू शकते. त्या जरी कोणावर अवलंबून नसल्या तरी पण त्यांनाही मन आहे. त्यामुळे त्याही योग्य व्यक्तीच्या शोधात असतातच. पण जर तुम्हाला अशा तरूणींना डेट करायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.

जबाबदाऱ्यांची वाटणी – स्वतंत्र विचारसरणी असणाऱ्या स्त्रियांना तुमच्यासोबत जबाबदाऱ्या विभागून घ्यायला आवडतील. तुम्हीही जबाबदारी घ्यायला हातभार लावावा, अशी अपेक्षा ती करेल. पण, तुमची त्यासाठी तयारी नसेल तर तिला काहीही अडचण येणार नाही. पण ती निराश होईल, हे मात्र खरे. कारण तुमच्या नात्यात तिच्या एवढी तुमचीही इनव्हॉलमेंट असावी, अशी तिची इच्छा असते.
स्पेस महत्वाची- तुमच्याबरोबरच्या नात्यात तिला स्वतःची स्पेस ही जपली जावी असे वाटेल. ती नेहमीच तुमच्या आ अवती-भवती असेल, तुमे लाड करेल अशी अपेक्षा करू नका. कारण तिला स्वतःसाठी वैयक्तिक वेळ हवा आहे. आणि तो वैयक्तिक वेळ तुम्हाला देण्यास तिला सांगू नका.
तिला वेळ द्या- या स्त्रिया सुरवातीपासून स्वावलंबी असतात. त्यांना कुठल्याही कामासाठी दुसऱ्यावर विसंबून राहण्याची सवय नसते. त्यामुळे तिला जिंकणे तेवढे सोपे नाही. तिच्या पाठी- पुढे करण्यापेक्षा तिला चागंला वेळ द्या. तिच्यावर मनापासून प्रेम करा, पण ्यासाठी तिला थोडा वेळ लागेल, त्यामुळे थोडा धीर धरा.
हेही वाचा: अग्गबाई सासूबाई! सासूशी आईसारखं नातं निर्माण करायचंय? या पाच गोष्टी लक्षात ठेवा

थेट बोला- या स्त्रिया स्वतच्या मनातल्या भावना सांगायला संकोचणार नाहीत. त्या दृढ विचार आणि स्पष्ट मतांच्या असतात. तुम्ही तुमची मते तिच्यावर लादू शकत नाही. मात्र ती तुमचे म्हणणे नक्की ऐकून घेईल. पण तिला जे पटेल, योग्य वाटेल त्याप्रमाणेच ती वागेल. तिला तुमच्या नात्यातून नेमके काय अपेक्षित आहे, काय हवे आहे याबद्दल तिची मते स्पष्ट आणि थेट असतील. त्यामुळे मुद्दे भरकटवून बोलण्यापेक्षा तिच्याशी थेट संवाद साधा.
आर्थिक बाळ- तिला पैशांची किंमत असेल. त्यामुळे तुमच्याकडूनही पैशांचा योग्य विनियोग होईल, ही तिला अपेक्षा असेल. तुम्ही तिला गिफ्ट द्यावेत, मदत करावी यासाठी कधी विचारणार नाही. कारण छोट्या गोष्टींतून आनंद कसा मिळवायचा हे तीला अत्यंत चांगले माहिती आहे. उलट तुम्ही पैसे वाचवलेत तर तिला आनंद होईल. आणि सेव्हिंग बाबत तुमचा दृष्टीकोन बदसायला ती मदतही करेल.
मदतीची अपेक्षा- ती स्वतःच्या समस्या स्वतः सोडवून शकते. दुसरे कोणीतरी येऊन मदत करेल याची ती वाट पाहत नाही. त्यामुळे समस्या आली की तिला मदत करण्याविषयी विनंती करा, मागे लागू नका. तुमच्या मदतीत खरेपण जाणवला तर ती नक्कीच तुमचे कौतुक करून कदाचित तुमच्या मदत स्विकारेल,
Esakal