IND vs NZ, T20 World Cup 2021: कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१मधील सलग दुसरा सामना हारला. पाकिस्तानने भारताला १० गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला ८ गडी राखून सहज हरवले. भारतीय संघाने २० षटकात ११० धावा केल्या आणि न्यूझीलंडने हे आव्हान १४.३ षटकात सहज पार केले. भारताच्या संघावर पराभवानंतर बरीच टीका झाली. त्यातच, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या मुद्द्यावरून विराटला चांगलंच सुनावलं.

हेही वाचा: IND vs NZ: आम्ही धैर्य दाखवले नाही; कोहलीची प्रामाणिक कबुली

IND वि NZ

IND वि NZ

भारतीय संघात फलंदाजीत एक बदल करण्यात आला होता. सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त असताना त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली होती. पण त्याला फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले आणि रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. त्यावरून सुनील गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: IND vs NZ: विराटवर संतापला गंभीर; म्हणाला, “प्रत्येकी वेळी…”

रोहित-शर्मा-विरुद्ध-ट्रेंट-बोल्ट

रोहित-शर्मा-विरुद्ध-ट्रेंट-बोल्ट

“इशान किशन हा नवा खेळाडू आहे. अशा खेळाडूला सलामीला पाठवणं आणि रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं म्हणजे रोहितचा अपमानच आहे. इशानसारखा खेळाडू चौथ्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि खेळाचा अंदाज घेऊन आक्रमक किंवा बचावात्मक खेळी करू शकतो. पण रोहितला अचानक तिसऱ्या क्रमांकाला पाठवणं बरोबर नाही. अशाने तुम्ही त्याला असा संदेश देत आहात की तुला ट्रेंट बोल्टच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करता येत नाही. मग असा संदेश दिल्यानंतर तो फलंदाजही काहीसा द्विधा मनस्थितीत पडतो”, अशा शब्दात गावसकर यांनी आपली भूमिका मांडली.

हेही वाचा: IND vs NZ : दिवाळीआधी टीम इंडियाचा शिमगा!

सुनील गावस्कर

सुनील गावस्कर

“गेल्या अनेक महिन्यांपासून जो खेळाडू सलामीवीर म्हणून चांगली खेळी करण्यास सक्षम आहेत अशा खेळाडूला अशाप्रकारे फलंदाजीत खाली पाठवणं योग्य नाही. जर इशान किशनने चांगली कामगिरी केली असती आणि ७०-८० धावा केल्या असत्या, तर हा विषय आलाच नसता. पण त्याला फारशी चांगली खेळी करता आली नाही, त्यामुळे आता हा विषय चर्चेत येणारच. रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं आणि स्वत: विराटने तिसऱ्या ऐवजी चौथ्या क्रमांकावर येणं हे न पटणारं होतं. आणि तशातच एका युवा खेळाडूला डाव सुरू करण्याची जबाबदारी देणं तर खूपच अनाकलनीय होतं”, असंही गावसकर म्हणाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here