शाहरुख खानचा (Shahrukh Khna) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याने तब्बल २६ दिवस आर्थर जेलमध्ये घालवले आहे. शनिवार जेव्हा आर्यनची सुटका झाली तेव्हा मन्नतवर त्याच ढोल-ताशांचा गजरात स्वागत करण्यात आलं होत. यातच घरी परतल्यानंतर आर्यनने इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये एक बदल केला आहे. त्याच्या या केलेल्या बदलाची चांगलीच चर्चा होत आहे.

आर्यनने मन्नतवर येताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील डीपी काढून टाकला आहे. आता डीपीमध्ये कोणताच फोटो नसून फक्त व्हाइट बॅकग्राउंड आहे. त्याने डीपी काढताच त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. नुकतच आर्यनच्या जामिनावर शाहरुखची मैत्रिण आणि अभिनेत्री जुही चावला ही आर्यन खानसाठी जामीनदार बनली आहे. सतीश मानशिंदे यांच्यासोबत जुही सेशन कोर्टात गेली होती. आर्यन खानसाठी जुहीने १ लाख रुपयाच्या जामीन हमीपत्रावर स्वाक्षरी केली. आता कोर्टाच्या परवानगीशिवाय आर्यनला देश सोडता येणार नाही, असे हायकोर्टाच्या आदेशात म्हटलं आहे. जामिनासाठी हायकोर्टाने १० अटी ठेवल्या आहेत. तर दर शुक्रवारी आर्यनला त्यांच्या मुंबईतील कार्यालयात एनसीबीसमोर हजर राहावं लागेल.

आर्यन खान

आर्यन खान

हेही वाचा: ‘यालाच म्हणतात संस्कार’; सारा-जान्हवीच्या केदारनाथ दर्शनवर नेटकरी खूश

याआधी, अरबाज मर्चंटचे वडील अस्लम मर्चंट यांनी आर्यनच्या तुरुंगातून सुटण्यास उशीर होण्यामागचे खरे कारण सांगितलं होत. त्यांनी ईटाइमला सांगितलं, “सेशन कोर्टात पेपरवर्कला उशीर झाला आणि जेव्हा रिलीझ मेमो टाईप केला जात होता तेव्हा संपूर्ण कोर्टाची वीज जवळपास २५ ते ३५ मिनिटांसाठी ट्रिप झाली होती.” त्यामुळे त्याच्या सुटकेचा आदेश कारागृहाबाहेरील बॉक्समध्ये लावता आला नाही. आर्यनसह त्याचा मित्र आणि सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here