पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील २१ विधानसभानिहाय मतदारसंघांमधील एक नोव्हेंबर २०२१ अखेर एकूण मतदारांची संख्या ७८ लाख ९५ हजार ८९४ इतकी झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख ३९ हजार ४९८ मतदार असून, त्यापाठोपाठ हडपसर आणि खडकवासला मतदारसंघात अधिक मतदार आहेत. पुणे कँटोन्मेंटमध्ये सर्वांत कमी दोन लाख ८१ हजार ८९ मतदार आहेत. विशेष म्हणजे कसबा पेठ मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार अधिक आहेत.

पुणे मतदार
निवडणूक विभागाकडून पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमधील एक नोव्हेंबर २०२१ अखेर मतदारसंख्या जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात मतदार संख्या ७८ लाख ९५ हजार ८९४ इतकी झाली आहे. त्यामध्ये ४१ लाख ३१ हजार ९४१ पुरुष मतदार असून, महिला मतदारांची संख्या ३७ लाख ६३ हजार ७०८ इतकी आहे, तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २४५ इतकी आहे.

पुणे मतदार
पुरुष – ४१३१९४१
स्त्री – ३७६३७०८
तृतीयपंथी – २४५
एकूण मतदार – ७८९५८९४
Esakal