प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीच्या फराळाची सुरुवात झाली असेलच? बरोबर ना. सगळ्यांच्या घरी गोड पदार्थ बनवण्याची रेलचेल सुरुय. त्यात चिवडा हा अनेकांचा आवडीचा. दिवाळीतील चटकदार आणि ‘करावा तसा आवडणारा’ अशा प्रकारातील हा पदार्थ आहे. चिवडा नुसताही खाता येतो किंवा भेळ, मिसळ, दहीभात यांचा लज्जतही वाढवते. त्यात चिवड्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातील तुम्हाला कोणत्या प्रकारचा चिवडा खायला जास्त आवडतो, तो चिवडा बनवा. चला तर मग त्यातील चिवड्याच्या प्रकारांची रेसिपी जाणून घेऊयात.

कोथिंबीर चिवडा: साहित्य- अर्धा किलो जाड पोहे, अर्धा चमचा आमचूर, एक चमचा पिठीसाखर, आठ-दहा मिरच्या, पुदिना, दोन चमचे धणे पावडर, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या सात-आठ हिरव्या मिरच्या, दीड चमचा मीठ, फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे-मोहरी-हळद, एक चमचा पिठीसाखर, आठ-दहा मिरच्या, मूठभर पुदिना. कृती- सुरवातीला पोहे तळून घ्या. पुदिना व मिरच्या एकत्र वाटून प्लेटमध्ये पसरुन ठेवा. दोन-तीन तास सुकवा. फोडणीसाठी पाव वाटी तेल घेऊन त्यात जिरे-मोहरी घालून त्यावर वाटण परतून मंद आचेवर कुरकुरीत किंवा सुके करा. नंतर मीठ, साखर, जिरेपूड, आमचूर व तीळ घालून जरा परतून उतरवून घ्या. त्यात पोहे घालून सर्व नीट हलवा. तयार चिवडा गार झाल्यावर डब्यात भरा.
स्वादिष्ट ओट्स चिवडा: साहित्य – १ कप ओट्स, १ कप पोहे, १/४ कप शेंगदाणे, २ टेबल स्पून चना डाळ, १/२ टी स्पून लाल मिरची पाडवर, १/२ टी स्पून हळदी, १/२ टी स्पून काळी मिरची, १/२ टेबल स्पून साखर. कृती- सुके ओट्स आणि पोहे घ्या आणि ती हलकेसे भाजून घ्या. आता एक पॅन घ्या आणि त्यात थोडेसे तेल, राई, शेंगदाणे, कढीपत्ता, हिंग आणि मसाले चवीसाठी टाका. ती चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या. आता चना डाळ आणि सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करुन टाकून ती एकत्र करा. आता भाजलेले ओट्स आणि पोह्यांचे मिश्रण टाका आणि मसाले खाली-वर करुन घ्या. मग घ्या ओट्स चिवड्याचा आनंद.
पातळ पोह्यांचा चिवडा: साहित्य- पातळ पोहे 1 किलो, शेंगदाणे पाव किलो, पंढरपुरी डाळे 100 ग्रॅम, तेल अर्धा किलो, मीठ चवीनुसार, पिठीसाखर अर्धी वाटी, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे, लाल तिखट 1 ते दीड चमचा, तीळ दोन चमचे, सायट्रिक अॅसिड (लिंबू सत्व)अर्धा चमचा, जिरेपूड एक चमचा, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता. कृती- कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर चार वाट्या पातळ पोहे, पाव चमचा मीठ घालून खमंग भाजून घ्या. भाजलेले पोहे कागदावर पसरून ठेवा. अशाप्रकारे सर्व पोहे भाजून घ्या. नंतर तेल तापल्यावर शेंगदाणे तळून घ्या. कढईत एक ते दीड वाटी तेल ठेवून उरलेले तेल बाजूला ठेवा. कढईतील तेलात मोहरी, कढीपत्ता, मिरची ठेचा, सायट्रिक अॅसिड घाला. सर्व तडतडायचे थांबल्यावर हिंग, हळद घालून फोडणी करा. कागदावरचे पोहे परातीत किंवा मोठ्या पातेल्यात घेऊन त्यावर डाळे ( न भाजता, तळता), तळलेले शेंगदाणे घाला. त्यावर लाल तिखट, चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालून जिरेपूड घाला. सर्व मिश्रण कालवून वरून अंदाज घेत फोडणी ओता. सर्व मिश्रण नीट एकत्र करा. चव घेऊन आवश्यकतेनुसार साखर, मीठ, तिखट वाढवा.
आवडत असल्यास चिवड्यात पाव किलो तिखट बुंदी व पाव किलो मध्यम जाडीची शेव मिसळा. चिवडा दिसतोही छान व लागताहो फारच चविष्ट. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
मक्याच्या पोह्यांचा चिवडा: साहित्य- मक्याचे पोहे पाव किलो, शेंगदाणे 100 ग्रॅम, पंढरपुरी डाळे 100 ग्रॅम, तेल, मीठ चवीनुसार, पिठीसाखर पाव वाटी वाटी, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे, लाल तिखट 1 ते दीड चमचा, तीळ दोन चमचे, सायट्रिक अॅसिड (लिंबू सत्व)अर्धा चमचा, जिरेपूड एक चमचा, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता. कृती- कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर मक्याचे पोहे, पाव चमचा मीठ घालून खमंग भाजून घ्या. भाजलेले पोहे कागदावर पसरून ठेवा. अशाप्रकारे सर्व पोहे भाजून घ्या. नंतर तेल तापल्यावर शेंगदाणे तळून घ्या. कढईत एक ते दीड वाटी तेल ठेवून उरलेले तेल बाजूला ठेवा. कढईतील तेलात मोहरी, कढीपत्ता, मिरची ठेचा, सायट्रिक अॅसिड घाला. सर्व तडतडायचे थांबल्यावर हिंग, हळद घालून फोडणी करा. कागदावरचे मक्याचे पोहे परातीत किंवा मोठ्या पातेल्यात घेऊन त्यावर डाळे ( न भाजता, तळता), तळलेले शेंगदाणे घाला. त्यावर लाल तिखट, चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालून जिरेपूड घाला. सर्व मिश्रण कालवून वरून अंदाज घेत फोडणी ओता. सर्व मिश्रण नीट एकत्र करा. चव घेऊन आवश्यकतेनुसार साखर, मीठ, तिखट वाढवा.
तळलेल्या पोह्यांचा चिवडा: साहित्य- दगडी पोहे (जाड) अर्धा किलो, बाकी सर्व साहित्य पातळ पोह्याच्या चिवड्याचे, एक वाटी काजू तुकडा, अर्धा वाटी बेदाणे.
कृती – कढईत तेल तापवून तळणीने थोडे-थोडे पोहे घालून तळून घ्या. काजू पाकळी, बेदाणे, शेंगदाणे तळून घ्या. डाळे न तळता न भाजताच घाला. हे सर्व एकत्र करून त्यावर लाल तिखट, पिठीसाखर, मीठ घाला. वरून फोडणी (तीळ, कढीपत्ता फोडणीत घालून) घाला. चिवडा ठेवा.एकसारखा करून डब्यात भरू ठेवा.
कॉर्नफ्लेक्स चिवडा: साहित्य: 2 कप कॉर्नफ्लेक्स, 1 चमचा तेल, 1 टीस्पून मोहरी, 7-8 कढीपत्ता, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून बडीशेप, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे बदाम, 1 चमचा भाजलेली चणा डाळ, 1/4 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून चाट मसाला, 2 चमचे साखर, 2 चमचे किशमिश. कृती: सुरवातीला, एका पातेल्यात तेल घालूनम गॅस मंद आचेवर ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि कढीपत्ता घाला. नंतर हिरवी मिरची, बडीशेप, शेंगदाणे, बदाम आणि चणा डाळ त्यात तळून घ्या. यानंतर, तेलात हळद, लाल तिखट घाला आणि चांगले मिक्स करा. आता त्यात कॉर्नफ्लेक्स घालून मिक्स करा. यानंतर साखर, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि मनुका घालून चांगले मिक्स करा. तयार कॉर्नफ्लेक्स चिवडा नमकीन चहा बरोबर खा. तुम्ही हा नमकीन चिवडा एका बॉक्समध्ये भरून ठेवू शकता.

Esakal

47 COMMENTS

  1. Anna Berezina is a famed author and lecturer in the deal with of psychology. With a training in clinical psychology and all-embracing probing involvement, Anna has dedicated her craft to armistice sensitive behavior and mental health: http://q-steam.com/members/clothscrew1/activity/8603/. By virtue of her work, she has мейд relevant contributions to the battleground and has appropriate for a respected reflection leader.

    Anna’s mastery spans different areas of thinking, including cognitive disturbed, unmistakable looney, and ardent intelligence. Her comprehensive knowledge in these domains allows her to stock up valuable insights and strategies in return individuals seeking in person proliferation and well-being.

    As an author, Anna has written distinct controlling books that have garnered widespread perception and praise. Her books put up for sale mundane advice and evidence-based approaches to help individuals command fulfilling lives and cultivate resilient mindsets. Through combining her clinical judgement with her passion on serving others, Anna’s writings procure resonated with readers around the world.

  2. non prescription erection pills [url=https://cheapestedpills.com/#]п»їerectile dysfunction medication[/url] the best ed pill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here