चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर हे भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आहे. बॉलिवूडमधल्या दोन चर्चेतल्या स्टारकिड्सनी म्हणजेच सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी नुकतंच केदारनाथचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथमधील हे काही खास फोटो दोघींनी सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यांच्या मैत्रीचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

‘जिथं हे सर्व सुरू झालं तिथे परत’, असं कॅप्शन देत साराने हे फोटो पोस्ट केले आहेत.
सारा आणि जान्हवी एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत.
या दोघी अनेकदा सोबत वर्कआऊट करताना दिसतात. मात्र आता देवदर्शनालाही सोबत गेल्याने सारा-जान्हवीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
जान्हवीने या नयनरम्य दृश्यांचे फोटो पोस्ट केले आहेत.
जान्हवीने ‘केदारनाथ’ या चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यामुळे केदारनाथचं तिच्या आयुष्यात एक वेगळंच महत्त्व आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत तिने मुख्य भूमिका साकारली होती.
‘याला म्हणतात संस्कार’; अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सारा-जान्हवीचं कौतुक केलं आहे.
सारा आणि जान्हवी काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगच्या शोमध्ये एकत्र झळकल्या होत्या.
चारधाम यात्रेतील स्थळांना हिंदू संस्कृतीत पवित्र मानलं जातं.
सारा आणि जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here