Virat Kohli leaves Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुबईच्या IPL आधी टीम इंडियाच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार, टी२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा हा भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण टी२० विश्वचषकानंतरच्या टी२० मालिकेसाठी रोहित नव्हे तर लोकेश राहुलला संघाचा कर्णधार करण्यात येणार आहेत, अशी माहिती सध्या दिली जात आहे.

हेही वाचा: ICC T20 Rankings: विराट, राहुलची घसरण; बाबर आझमची जागा भक्कम

टी२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारताची न्यूझीलंड विरोधात टी२० क्रिकेट मालिका रंगणार आहे. भारतीय संघ गेल्या अनेक महिन्यांपासून फिरतीवर आहे. भारतीय संघ २०२०च्या शेवटी ऑस्ट्रेलियात होता. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात क्रिकेट मालिकेसाठी आला. त्यानंतर IPL चा हंगाम आला. तो अर्ध्यावर सोडल्यानंतर भारत वि न्यूझीलंड विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी झाली. त्यात पराभूत झालेला संघ लगेचच इंग्लंडमध्ये कसोटा मालिका खेळला. तेथून दुबईला IPLची उर्वरित स्पर्धा खेळण्यासाठी सर्व खेळाडू आले. आणि आता केवळ ३-४ दिवसांच्या अंतराने भारतीय संघ टी२० विश्वचषक स्पर्धेत उतरला. या सर्व क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघ बायो बबलमध्ये होता. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्यावर झाला असं बोललं जात आहे. परिणामी भारतीय संघाच्या वरिष्ठ फळीतील खेळाडूंना न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्याचा BCCI विचार करत आहे, असं सांगितलं जात आहे.

केएल राहुल

केएल राहुल

हेही वाचा: IND vs NZ: विराटवर संतापला गंभीर; म्हणाला, “प्रत्येकी वेळी…”

“भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना आता विश्रांतीची गरज आहे. लोकेश राहुल हा भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे हे साऱ्यांनाचा माहिती आहे. टी२० क्रिकेटमध्ये त्याने आपली छाप उमटवली आहे. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सामान्यत: लोकेश राहुलकडेच असेल”, असे BCCI चे अधिकारी ANI शी बोलताना म्हणाला.

“न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे पण १०० टक्के क्षमतेने स्टेडियम भरणं शक्य नाही. जेथे सामना असेल तेथील स्थानिक प्रशासनाशी बोलून अंतिम निर्णय घेतला जाईल”, असंही BCCI च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here