दिवाळी जवळ आली की मुली, स्त्रिया पार्लरमध्ये जावून आयब्रो, वॅक्सिन, फेशियल करतात. आपण छान दिसावं अशी त्यांची इच्छा असते. हे सगळं केल्याने चेहऱ्याला ग्लो आलेला असतो. तो ग्लो साडी नेसल्यावर तर अधिकच बहारदार होतो. पण फक्त स्त्रियांनीच का सुंदर दिसायचं. पुरूषांनाही सणाच्या काळात आपण हॅण्डसम दिसावं असं वाटत असेलच ना. गेल्या काही वर्षात पुरुषांसाठीही सौंदर्यप्रसाधनं बाजारात आली आहेत. या दिवाळीत काही योग्य गोष्टींचा वापर करून तुम्ही हॅण्डसम दिसू शकता. त्यासाठी या टिप्स.


आजकाल दाढी राखणे पुरुषांना आवडते. सध्या तर दाढी हाच ट्रेंड आहे. अनेकांची दाढी मुळातच मोठी आणि जाड असते. तर केसांची वाढ मनासारखी होत नसल्याने अनेकजण वैतागलेले असतात. अशावेळी बिअर्ड ऑईलचा वापर करून तुमच्या दाढीची वाढ होऊ शकते. हे तेल वापरल्याने तुमची दाढी निरोगी राहून चांगली मेन्टेन राहील.


Esakal