IND vs NZ, T20 World Cup 2021: भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामने गमावले. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होता. त्यात भारत १० गड्यांनी पराभूत झाला. पाठोपाठ न्यूझीलंडने भारताला ८ गडी राखून पराभूत केले. भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात केवळ ११० धावा केल्या. हे आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केवळ १४.३ षटकांमध्येच गाठले आणि भारताला मोठ्या पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर टीम इंडियावर टीका होत असतानाच त्या सामन्याआधी एका पंचांना थेट अंपायर्स पॅनेलवरून काढून टाकण्याची कारवाई ICC ने केल्याचे समोर आले.
हेही वाचा: IND vs NZ: विराटवर संतापला गंभीर; म्हणाला, “प्रत्येकी वेळी…”
मूळचे इंग्लंडचे असलेले पंच मायकल गॉफ हे नुकत्याच झालेल्या भारत विरूद्ध न्यूझीलंड या सामन्यात पंच म्हणून काम पाहणार होते. पण सामन्याआधीच या पंचांवर ICC ने मोठी कारवाई केली. मायकल गॉफ यांना ICC ने थेट पंचाच्या यादीतून काढून टाकलं. टी२० विश्वचषकासाठी जे लोक खेळाडू, पंच किंवा कर्मचारी म्हणून काम पाहत आहेत, त्यांना बायो बबलमध्ये राहणं बंधनकारक आहे. पण मायकल गॉफ यांनी बायो बबलचा नियम मोडल्यामुळे त्यांनी अंपायर्स पॅनेलवरून काढून टाकल्याचे वृत्त डेली मिररने दिले आहे.
हेही वाचा: IND vs NZ: “हा विराटने रोहितचा केलेला अपमान”; गावसकर भडकले…

अंपायर-मायकेल-गॉफ
हेही वाचा: T20 WC: “भारताला वाटतं IPL म्हणजे…”; वासिम अक्रमचा टोमणा
मायकल गॉफ हे आता पुढील सहा दिवस कोणत्याही सामन्यात पंच म्हणून उभे राहू शकणार नाहीत. बायो बबलचा नियम मोडल्यामुळे त्यांना आता पुढील सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यांना भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहायची संधी होती. पण त्यांनी बायो बबलचा नियम मोडला असल्याचे सामन्याच्या काही वेळ आधी ICC ला समजले. त्यामुळे त्यांना पंचांच्या यादीवरून हटवत त्या जागी मॅरे इरॅस्मस यांनी पंच म्हणून त्या सामन्यात संधी देण्यात आळी.
Esakal