विराट कोहली अयशस्वी कर्णधार: सध्या दुबईत सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले. भारताला पाकिस्तानने १० गडी राखून तर न्यूझीलंडने ८ गडी राखून पराभूत केले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीका झाली. तशातच पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने थेट विराटवरच तोंडसुख घेतलं. विराट कोहली हा कर्णधारपद भूषवण्यासाठी असक्षम आहे, असं विधान त्याने केलं.

हेही वाचा: T20 WC: “भारताला वाटतं IPL म्हणजे…”; वासिम अक्रमचा टोमणा

“विराट हा एक अयशस्वी कर्णधार आहे. त्यामागे खूप कारणं आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत संघ निवडताना चुका केल्या. ऑस्ट्रेलियात देखील विराट असेपर्यंत भारताचा संघ पराभूत होत होता. पण तो गेला आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने मालिका जिंकली. विराट हा मोठा खेळाडू आहे यात दुमत नाही, पण त्याच्यात यशस्वी कर्णधार बनण्याचे गुण नाहीत. विराट कोहलीकडे आक्रमकता आहे. पण कर्णधार म्हणून निर्णयक्षमता असणंदेखील आवश्यक असतं. ते विराटकडे दिसत नाही”, असं सडेतोड मत दानिश कनेरियाने व्यक्त केलं.

विराट-कोहली-टीम-भारत

विराट-कोहली-टीम-भारत

हेही वाचा: IND vs NZ मॅचआधी तडकाफडकी गॉफ यांना पंचांच्या यादीतून हटवलं!

“विराटचं मला काही कळतंच नाही. तो RCB साठी सलामीवीर म्हणून खेळतो. IPL सुरू असताना तो सांगतो की मी वर्ल्ड कपमध्येही सलामीला येईन. पण जसा-जसा वर्ल्ड कप जवळ येतो तसा तो अचानक सांगतो की लोकेश राहुलला सलामीला पाठवण्यात येईल. मग या साऱ्या प्लॅनिंगमध्ये अचानक न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात इशान किशन कुठून आला? रोहित शर्मा संघाचा उपकर्णधार आहे. पण त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं म्हणजे त्याला असं सांगणं की ट्रेंट बोल्ट त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी आहे”, अशी टीका त्याने केली.

दानिश कनेरिया

दानिश कनेरिया

हेही वाचा: IND vs NZ: विराटवर संतापला गंभीर; म्हणाला, “प्रत्येकी वेळी…”

“भारताचा असा विचार होता की आपण रोहित-राहुल ऐवजी अचानक इशान किशनला सलामीला पाठवलं तर न्यूझीलंड गोंधळून जाईल. पण खरं पाहता न्यूझीलंड आणि केन विल्यमसनकडे A,B,C असं सगळे प्लॅन होते. विल्यमसनने घेतलेले सारे निर्णय अचूक होते. त्यांचे सर्व खेळाडू अप्रतिम खेळले. भारताने रोहित-राहुलला सलामीला उतरवायला हवं होतं. इशानला तुम्ही नक्कीच खेळवणं अपेक्षित होतं, पण मी त्या जागी असतो तर मी इशानला हार्दिकच्या जागी संघात खेळवलं असतं”, असंही दानिशने स्पष्ट केलं.

टीम-इंडिया

टीम-इंडिया

हेही वाचा: IND vs NZ: ‘कुछ तो शरम करो..’; विराटवर संतापले भारतीय फॅन्स

“रवी शास्त्री तर गायबच झाल्याचे दिसतात. त्यांना असं वाटतंय की माझा कार्यकाळ संपत आलाय. मला फार विचार करण्याची गरज नाही. वर्ल्ड कप मध्ये जे काही घडायचं ते घडू दे. धोनीला मी फारसा दोष देणार नाही. तो आताच संघासोबत जोडला गेला आहे”, असंही दानिश कनेरियाने स्पष्ट केलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here