
दिवाळीच्या खास मुहूर्तावर पारंपरिक पेहरावाबद्दल जर तुम्ही गोंधळात असाल, तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.

गेल्या काही वर्षांत कतरिना कैफनं फॅशन इंडस्ट्रीला एक नवा आयाम दिलाय. उत्कृष्ट अभिनयासोबतच ती तिच्या फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.

फॅशनच्या दुनियेत कतरिना पॉइंट ड्रेसिंग स्टाइलसाठी ओळखली जाते.

परदेशात राहूनही कतरिनाचा पारंपरिक पोशाखाकडं कल पहायला मिळतो.

कतरिनानं अतिशय सुंदरपणे साडी कॅरी केलीय. भारत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कॅट फ्लोरल ऑर्गन्झा साडीत दिसली होती. तेव्हापासून बाजारात ऑर्गेन्झा साडीची मागणी वाढलीय.

नवविवाहित स्त्रिया दिवाळीसाठी कॅटचा लाल ड्रेसही निवडू शकतात. कतरिना या लूकमध्ये अगदी साधी दिसतीय.

जर तुम्हाला रंगांचा प्रयोग करायला आवडत असेल, तर लाऊड पिंक साडी तुमच्यासाठी पर्याय असू शकते.
Esakal