
धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, दिपावली पाडवा हे दिवाळीतील मुख्य दिवस समजले जातात. पण रमा एकादशीपासूनच दिवाळी सणाला सुरुवात होते.

दिवाळीचा सण (Diwali 2021) आता अगदी तोंडावर आला आहे. खरंतर आजपासून म्हणजेच वसुबारसेच्या दिवसापासून दिवाळी सुरू होते, असं मानलं जातं. तरीही धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होते.

हा आठवडा दिवाळीच्यानिमित्ताने धार्मिक तसेच आनंदाची पर्वणी देणारा ठरणार आहे.

आठवडाभर दिवाळीतील विविध दिवशी घरांमध्ये तसेच व्यवसायांच्या ठिकाणी पूजा अर्चा होणार असून याशिवाय दिवाळी पाडवा तसेच अन्य दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे

धनत्रयोदशीच्या दिवशी घराबाहेर दिव्यांची रोषणाई केली जाते. भगवान धन्वंतरी यांचं पूजन या दिवशी केलं जातं. या दिवशी भगवान कुबेर, लक्ष्मी यांच्यासह भगवान धन्वंतरी यांची या दिवशी पूजा केल्यास घरात कायम धन-धान्य, सुख-समृद्धी, वैभव, आरोग्य यांचा वास कायम राहतो, असं मानलं जातं.
Esakal