विराट कोहली अयशस्वी कर्णधार: सध्या दुबईत सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले. भारताला पाकिस्तानने १० गडी राखून तर न्यूझीलंडने ८ गडी राखून पराभूत केले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली. तशातच न्यूझीलंडविरूद्ध भारताने रोहितला वगळून इशानला सलामीला पाठवलं होतं. त्यावरून अनेकांनी संघ व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले होते. त्यावर आता भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी आपले मत व्यक्त केले.
हेही वाचा: T20 WC: “भारताला वाटतं IPL म्हणजे…”; वासिम अक्रमचा टोमणा
“सामन्याआधीच्या रात्री सूर्यकुमार यादवच्या पाठीदुखीने उचल खाल्ली. त्यामुळे तो मैदानात उतरण्यासाठी फिट नव्हता. त्याच्या जागी संघात येणारा खेळाडू हा इशान किशन होता आणि त्याने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे इशानला सलामीला पाठवण्याची कल्पना ही संपूर्ण संघ व्यवस्थापनाची होती. ज्या गटाने हा निर्णय घेतला त्यात स्वत: रोहित शर्मादेखील होता. संपूर्ण चर्चा आणि इशानला सलामीला पाठवण्याचा निर्णय त्याच्या सहमतीनेच झाला”, अशी महत्त्वाची माहिती संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिली.

विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे
हेही वाचा: IND vs NZ: “हा विराटने रोहितचा केलेला अपमान”; गावसकर भडकले…
“इशान किशन हा नवा खेळाडू आहे. अशा खेळाडूला सलामीला पाठवणं आणि रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं म्हणजे रोहितचा अपमानच आहे. इशानसारखा खेळाडू चौथ्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि खेळाचा अंदाज घेऊन आक्रमक किंवा बचावात्मक खेळी करू शकतो. पण रोहितला अचानक तिसऱ्या क्रमांकाला पाठवणं बरोबर नाही. अशाने तुम्ही त्याला असा संदेश देत आहात की तुला ट्रेंट बोल्टच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करता येत नाही. मग असा संदेश दिल्यानंतर तो फलंदाजही काहीसा द्विधा मनस्थितीत पडतो”, अशा शब्दात गावसकर यांनी आपली भूमिका मांडली.
Esakal