इंदापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कर्मयोगी कारखान्याकडून मागील हंगामात गाळप झाले ऊसाचे बील मिळत नसल्याच्या कारणावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत कारखान्यावर दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून काटा बंद आंदोलन सुरू केले. कारखाना प्रशासनाने कारखाना अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा करून दि. १५ नोव्हेंबर पर्यंत सर्व बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासनदिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र यावेळी पाच तास काटा शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.

बिजवडी ( या. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखरकारखाना मागील वर्षीच्या गाळप हंगामात इंदापूर,माढा ,करमाळा, दौंड, राशीन तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ऊस घातला. त्यांना यंदादिवाळी सणाच्या तोंडावर गाळप ऊसाचे पैसे न मिळाल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले.त्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच इंदापूर पोलीस
निरीक्षक टी. वाय. मुजावर व कर्मचारी कारखाना कार्यस्थळावर आले. श्री. मुजावर यांनी कारखाना प्रशासन,आंदोलनकर्ते यांच्या मध्ये मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला.
हेही वाचा: आरोग्य विभागाचा पेपर विभागाच्या चुकीनेच फुटला
यावेळी जेऊर ( ता. करमाळा ) येथील शेतकरी नितीन शिरसकर म्हणाले,घरात सात माणसे आहेत, कारखान्याकडून फक्त २५ हजार रुपये येणे आहे मात्र ते वेळेत न मिळाल्याने केवळ पाच हजार रुपयांसाठी वडिलांचा मृत्यू झाला असे म्हणत त्यांना रडू कोसळले तर वडशिवणे येथील शेतकऱ्याने २०० टन ऊस कारखान्यास घातला मात्र पैसे न मिळाल्याने सहा लाख रुपये कर्ज घरातील तीन कोरोना रुग्णांवरील उपचारा साठी काढले, मात्र त्यामध्ये भावाचा मृत्यू झाला, त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी तरंगवाडी येथील शेतकरी नितीन गोफणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्टेटस ठेवल्यास पैसे मिळतात,राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या लोकांना पैसे मिळत नाहीत असा आरोप केला.
आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेवून कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. लोकरे यांनी अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व संचालक मंडळाशी संपर्क साधला. कारखान्याने २१०
कोटी रुपये दिले आहेत, उर्वरित सुमारे १५ कोटी रुपये देणे बाकी आहे. सदर रक्कम १५ नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्या त जमा करण्याचे लेखी दिल्यानंतर आंदोलन थांबले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी उस्फुर्त पणे कोणत्याही नेत्याशिवाय हे आंदोलन केले.
Esakal