खडकवासला : कोरोना काळात आदिवासी, कातकरी व शेतमजुर यांचे जीवनावर देखील परिणाम झाला आहे. त्यांचे घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून पुण्यातील केअर टेकर सोसायटीतर्फे खडकवासला सिंहगड दऱ्या खोऱ्यातील दुर्गम भागातील आदिवासी कातकरी कुटुंबाना स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने फराळाचे वाटप करण्यात आले.

आदिवासी, कातकरी व शेतमजुर रानावनात राहतात. मिळेल ते काम प्रामाणिक पणे अतिशय काबाड कष्ट करून उपजीविका होत असते. हवेली तालुक्यातील वरदाडे, सोनापूर, जांभली व डावजे येथील आदिवासी, कातकरी समाजातील कुटुंब आहेत. केअर टेकर सोसायटीतर्फे त्यांना दिवाळी फराळ, महिलांसाठी साड्या व मुलांसाठी कपड्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे त्यांचे जीवनावर देखील परिणाम झाला आहे. त्यांचे घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून कै. हरिदास भिकुदास दोशी यांचे स्मरणार्थ 70 कुटुंबासाठी सुवासिक तेल, उटणे, साबण आणि पणत्या देखील देण्यात आल्या. केअर टेकरचे स्वयंसेवक फराळ वाटप करायला गेले होते. ही सर्व कुटुंबे शेतकऱ्यांचे शेतात रोजाने भात काढणी व झोडण्याच्या कामासाठी शेतावर गेलेले होते. त्याठिकाणी शेतात जागेवर जाऊन फराळ वाटप करण्यात आला.
हेही वाचा: “नवाब मलिक जावयामुळे वेडे झालेले जगातील पहिले सासरे”
याप्रसंगी शिवसेना विधानसभा प्रमुख नितीन वाघ, केअर टेकर सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, सुशांत खिरीड, अभिजित तावरे, विनोद थोपटे, माऊली वसवे, गणेश पवार, संभाजी तनपुरे, भाऊ पवळे, विठ्ठल तावरे, हे उपस्थित होते. केअर टेकर्स सोसायटीचे विजय बेलिटकर, इरफान मुल्ला, संजय असरकर, रणजित परदेशी, दिनेश नाळे, महेंद्र क्षीरसागर, शशिधर पूरम, विष्णू दोषी, कल्पना मुळगावकर, प्राजक्ता क्षीरसागर, प्रियांका नाळे, प्रतीक्षा नाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आमच्या मुलांना शालेय साहित्य द्या…
फराळ वाटप करताना वरदाडे येथील महिलांनी यांनी एक खंत व्यक्त केली की, आमच्या वस्तीवर मुलांसाठी शाळा सुरू झाली असून त्यांच्यासाठी शालेय साहित्य मिळावे. अशी मागणी केली. तात्काळ हे साहित्य देण्याचे वचन त्यांना उपस्थितांनी दिले.
Esakal