भारतात अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत. कर्नाटकातील वेणुगोपाल स्वामी मंदिर हे या अद्भुत मंदिरांपैकी एक आहे.

भारतात अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत. कर्नाटकातील वेणुगोपाल स्वामी मंदिर हे या अद्भुत मंदिरांपैकी एक आहे. वेणुगोपाल स्वामी मंदिर हे कर्नाटकातील होसा कन्नमबाडी येथील कृष्ण राजा सागर (KRS) धरणाजवळ आहे.
हे मंदिर मूलतः 12 व्या शतकात होयसळ राजघराण्यानं बांधलं होतं. हे मंदिर तब्बल 70 वर्षे पाण्यात होतं आणि 2011 मध्ये .याचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे.
कृष्ण राजा सागर धरण प्रकल्पाची संकल्पना सर एम विश्वेश्वरय्या यांनी सन 1909 मध्ये मांडली होती. तेव्हा हे मंदिर संकुल कन्नमबाडी येथे होते.
केआरएस धरण प्रकल्प पूर्ण झाल्यावर कन्नमबाडी गाव आणि आसपासच्या इतर वस्त्या पाण्याखाली जाण्याची शक्यता होती.
तेव्हा म्हैसूरचा तत्कालीन राजा कृष्ण राजा वाडियार चौथा याने कन्नमबाडीच्या रहिवाशांसाठी एक नवीन गाव बांधण्याचा आदेश दिला आणि त्याचं नाव होसा कन्नमबाडी म्हणजेच, नवीन कन्नमबाडी असं ठेवलं.
मूळ मंदिर परिसर सुमारे 50 एकरात पसरलेला आहे. केआरएस धरण पूर्ण झाल्यानंतर 70 वर्षांहून अधिक काळ मंदिर पाण्यात बुडालं होतं.
त्यानंतर खोडे फाउंडेशननं मंदिराचं स्थलांतर व जीर्णोद्धार करण्याचं काम हाती घेतलं. डिसेंबर 2011 पर्यंत मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला.
मंदिर आणि धरणात एकाचवेळी प्रवेशासाठी लोकांना 30 रुपये मोजावे लागतात. त्याचबरोबर मंदिर प्रवेशासाठी केवळ 15 रुपये शुल्क भरावे लागते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here