सँडविच.असं म्हटल की आपल्या डोळ्यासमोर ब्रेडच्या मध्ये भरलेल्या भाज्यांचे स्लाईस, चटणी, सॉस मध्ये भरलेला पदार्थ समोर येतो. वेगवेगळ्या रंगीबेरंगी भाज्यांचे सुरेख मिश्रण केलेले असेल, त्यावर मेयोनीज, चीज घालून त्याला सजवले असेल तर हा पदार्थ पाहताक्षणी पोट अर्थे भरलेले असते. त्यामुळेच की काय अनेकजण पोटभरीला योग्य पर्याय म्हणून सँडविचची निवड करतात. आपल्याला वाटेल की हा भारतीय पदार्थ असू शकतो. पण मुळात हा पाश्चिमात्य पदार्थ असून एका माणसाने त्याच्या आवडीसाठी आणि पोट चांगले भरावे म्हणून हा पदार्थ केला. आता तो जगभरात लोकप्रिय आहे.

टूना सँडविच
असा आहे इतिहास
जॉन माँटेग्यू फोर्थ अर्ल ऑफ सँडविच. हे इंग्लंडमधल्या केंट येथील सँडविच या प्रांतात राहायचे. सँडविच हे एका प्रांताचे नाव असून ऐतिहासिक शहर आहे.जॉन माँटेग्यू यांना चविष्ट पदार्थ खाण्याचा छंद होता. त्यांनी खरपूस भाजलेले मांस पावात गुंडाळून खाण्यासाठी देताना कुठे तरी पाहिले होते आणि त्यावरून त्यांनी अशा प्रकारच्या पदार्थाची ऑर्डर त्यांच्या शेफला दिली. त्यामुळे त्या पदार्थाला सँडविच हे नाव पडलं असावं अशी शक्यता सांगितली जाते.
अजून एक गोष्ट याविषयी सांगितली जाते,. लंडनमध्ये एक व्यक्ती अगदी हॉटेल बंद होता होता पोहोचली. ती अतिशय भुकेली होती. सर्व जेवण संपल्याने शेफने जे काही उपलब्ध होते त्यापासून पदार्थ बनवून त्या व्यक्तीला दिला. हा पदार्थ नवा होता. पण ते सँडविच नावाटे हॉटेल होते समुद्रकिनारी. म्हणून तो पदार्थही सँडविच नावाने ओळखला जाऊ लागला. यानंतर अनेक कथा सांगितल्या गेल्या.
ओ प्रकार लोकप्रिय
व्हेज सॅंडविच
चीच सॅंडविच
कुकुंबर सँडविच
एग सँडविच
चीज सँडविच
कॉर्न आणि मेयो सँडविच
कॉर्न बिफ सँडविच
Esakal