हिंदी चित्रपट विश्वामध्ये बऱ्याच काळापासून आपल्या आडनावाचा ठसा कपूर कुटूंबियांनी कायम ठेवला आहे. यासगळ्याची सुरुवात ज्यांच्या नावापासून झाली त्या पृश्वीराज कपूर यांचा आज स्मृतीदिन. त्यांनी बॉलीवूडसाठी केलेलं काम, त्यांचा अभिनय, त्यांची चित्रपट या माध्यमाकडे पाहण्याची दृष्टी यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले. आजही त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर जाणकार चित्रपट अभ्यासक, प्रेक्षक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आपण त्यांच्याविषयीच्या काही अज्ञात गोष्टी जाणून घेणार आहोत.

तेव्हा हिंदी चित्रपट हा मूकपट होता. कृष्णधवल चित्रफितीमध्ये चित्रपट प्रदर्शित होते. अशा काळात पृथ्वीराज कपूर यांचे योगदान असाधारण आहे.
पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 लायलपूर (सध्याचे फैसलाबाद) याठिकाणी झाला.
आता हा भाग पाकिस्तानात आहे. त्यांचे वडिल बसवेश्वरनाथ कपूर हे इंडियन इंपिरियल पोलीसमध्ये अधिकारी होते.
पृथ्वीराज कपूर हे तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. पृथ्वीराज यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांना अभिनेता व्हायचे होते.
1929 मध्ये ते पेशावरुन कामाच्या निमित्तानं मुंबईत आले. आणि इंपिरियल कंपनीमध्ये विनापगार कलाकार म्हणून काम करु लागले. त्यावेळी 1931 मध्ये आलमआरा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
पृथ्वीराज कपूर यांचा पहिला चित्रपट 1929 साली प्रदर्शित झाला. त्याचे नाव सिनेमा गर्ल असे होते. भारतातल्या पहिल्या बोलपटात आलमआरामध्ये देखील ते एका सहायक अभिनेता विद्यापतीच्या भूमिकेतही ते दिसून आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here