IND vs AFG, T20 World Cup 2021: भारतीय संघाने दोन मोठे पराभव पचवल्यानंतर आता त्यांचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. दुबईत सामना असल्याने अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंना धडाकेबाज कामगिरी करण्याची संधी आहे. तर भारतीय संघासाठी आजचा सामना हा प्रतिष्ठेचा असणार आहे. भारतीय संघाने पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघाविरूद्ध पराभव पत्करला आहे. त्यामुळे आज तिसऱ्या सामन्यात भारताला विजय अत्यावश्यक आहे. त्याचसोबत अफगाणिस्तानने पुढील सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले तरच भारताला स्पर्धेत जिवंत राहणं शक्य आहे. त्याआधी पाहूया भारत विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यांचा इतिहास…

अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

हेही वाचा: IND vs NZ: रोहित शर्माबद्दल भारताच्या बॅटिंग कोचचं मोठं विधान

भारत आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी एकमेकांविरूद्ध केवळ दोन टी२० सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने टी२० वर्ल्ड कप दरम्यान खेळवण्यात आले आहेत. पहिला सामना २०१०च्या टी२० वर्ल्ड कप दरम्यान खेळण्यात आला होता. त्यात भारत सात गडी राखून जिंकला होता. दुसरा सामना २०१२च्या वर्ल्ड कपमध्ये रंगला होता. त्यावेळीही भारताचे सामना २३ धावा राखून जिंकला होता.

भारत आणि अफगाणिस्तान शेवटचे वर्ल्ड कपमध्ये खेळले ते २०१९चा वन डे वर्ल्ड कप होता. त्या स्पर्धेत अफगाणिस्तानने भारताला चांगलीच टक्कर दिली होती. पण भारताने अफगाणिस्तानला ११ धावांनी मात दिली होती.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अफगाणिस्ताच्या संघाने या स्पर्धेत दोन मोठे विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यावर भारतासाठी अफगाणिस्तान हा देखील एक स्पर्धेक बनू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे.

हेही वाचा: T20 WC: “भारताला वाटतं IPL म्हणजे…”; वासिम अक्रमचा टोमणा

विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे

विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे

सध्या भारतीय संघ २ सामन्यात शून्य गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर अफगाणिस्तानचा संघ दोन विजयांसह ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ब गटातून पाकिस्तानचा संघ आधीच सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे आथा या गटातून केवळ एकच संघ पुढील फेरीत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत भारताला अफगाणिस्तानसह उर्वरित तीनही सामने जिंकावेच लागतील. इतकंच नव्हे तर भारताला हे सामने मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं असणार आहे. याशिवाय, दुसरा मुद्दा म्हणजे अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करणं हेदेखील तितकंच गरजेचं असणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here