मराठी कलाकार हे अनेकदा दाक्षिणात्य लूकच्या प्रेमात पडल्याचं दिसून येतं. काही कलाकारांनी लग्नात तर काहींनी साखरपुड्यासाठी दाक्षिणात्य लूक केला होता. मराठी कलाकारांचा हा लूक तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता.

अभिनेत्री रसिका सुनीलने तिच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी दाक्षिणात्य लूक केला होता.
मराठीतील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी त्यांच्या केळवणासाठी दाक्षिणात्य लूक केला होता.
सिद्धार्थ-मितालीच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळाली होती.
अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुशी भावे यांनी त्यांच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी हा विशेष लूक केला होता.
दाक्षिणात्य सिनेमे, खाद्यपदार्थ यांनी प्रभावित होऊन आम्ही साखरपुड्यासाठी दाक्षिणात्य लूक करण्याचं ठरवलं, असं सुयशने सांगितलं होतं.
सुयश-आयुशीचा हा लूक तुम्हीसुद्धा सहज फॉलो करू शकता.
अभिनेत्री स्मिता तांबेनंही तिच्या लग्नात दाक्षिणात्य लूक केला होता. स्मिताचा पती हा उत्तर भारतातील आहे.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने लग्नात दाक्षिणात्य लूक केला होता.
लेक माझी लाडकी, जुळून येती रेशीमगाठी यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री सायली देवधरने केलेला हा खास लूक
सायलीने गौरव बुसरे याच्याशी लग्नगाठ बांधली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here