ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या बाबतीत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘वायू प्रदूषणाची चिंता हे मुलांना फटाक्यांचा आनंद अनुभवण्यापासून रोखण्याचं कारण नाही. त्यांच्यासाठी तुमचा त्याग म्हणून, तुम्ही ऑफिसला जाताना तीन दिवस चालत जा. त्यांना फटाके फोडण्याची मजा घेऊ द्या,’ असं ते म्हणतात. आता त्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीपूर्वी फटाक्यांवर बंदी घालण्याच्या चर्चेला वेग आला असताना, आता फटाक्यांच्या बंदीचे समर्थन करणाऱ्यांवर कंगनाने तिची असहमती दर्शवली आहे. तिने सद्गुरूंचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सद्गुरूंनी सुचवलेल्या उपायाला दुजोरा दिला आहे.
कंगनाच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सद्गुरु त्यांच्या दिवाळीच्या लहानपणीच्या आठवणी शेअर करताना दिसले. ते शेअर करत तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिलं, “ही ती व्यक्ती आहे, ज्यांनी लाखो वृक्षारोपण करुन हरित क्रांतीचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना अचूक उत्तर दिलं आहे, दिवाळीच्या दिवसात तुम्ही तीन दिवस कार वापरू नका आणि तुमच्या कार्यालयात तुम्ही चालत जा.”
हेही वाचा: अखेर ‘शनाया’च्या लग्नाचा फोटो आला समोर

कंगना राणौत
दरम्यान, ‘वीरे दी वेडिंग’ची निर्माती रिया कपूरने दिवाळीत फटाके फोडण्याबद्दल तिची निराशा व्यक्ती केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिलं की, “फटाके फोडणं हे अत्यंत अज्ञानी, अविवेकी आणि बेजबाबदारपणाचं आहे.” मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी नागरिकांनी दिवाळीच्या काळात फटाके फोडताना ध्वनी आणि वायू प्रदूषणाचं प्रमाण तपासण्याचं आवाहन केलं. “फटाके हे दिवाळी सणाचा अविभाज्य भाग आहेत आणि ते असलंच पाहिजेत. मात्र, फटाके फोडताना लोकांनी ध्वनी आणि वायू प्रदूषणाची पातळी तपासली पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.
Esakal