
अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ दोन दिवसांनी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगणही असणार आहेत.

याशिवाय निहारिका रायजादा ही सुंदर अभिनेत्रीही चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहे.

निहारिका रायजादा अक्षय कुमारसोबत दुसऱ्यांदा काम करत आहे. सूर्यवंशीपूर्वी तिनं अक्षयच्या ‘बेबी’मध्ये पत्रकाराची भूमिका साकारली होती.

सूर्यवंशीमध्ये निहारिका रायजादा ताराची भूमिका साकारत आहे. अक्षयसोबत ती दहशतवादविरोधी महिला पथकाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

निहारिका रायजादा ही दिवंगत बॉलिवूड संगीतकार ओपी नय्यर यांची नात आहे. तिचा जन्म लक्झेंबर्गमध्ये झाला होता.

निहारिकानं 2013 मध्ये ‘डामाडोल’ या बंगाली चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर तिनं मसान, अलोन, बेबी, एक काली, वॉरियर सावित्री आणि टोटल धमाल या चित्रपटांत काम केलंय.
Esakal