2 Groups Team India: भारतीय संघ सध्या टी२० वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत भारताने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या स्पर्धेनंतर कर्णधार विराट कोहली हा आपल्या पदावरून पायउतार होणार आहे. संघातील खेळाडू म्हणून तो कायम असणार आहे, पण टी२० संघाचे नेतृत्व मात्र तो करणार नाही. त्यामुळे विराट कोहली आणि टीम इंडिया टी२० वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. पण तसं घडताना दिसत नाही. तशातच, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने, टीम इंडियात फूट पडल्याचं विधान करत खळबळ माजवली आहे.
हेही वाचा: T20 WC: टीम इंडियाचं नक्की काय चुकतंय? सचिनने दिलं उत्तर
“भारतीय संघात दोन गट पडलेत हे मला स्पष्ट दिसतंय. एक गट हा कोहलीसोबत आहे. दुसरा गट हा कोहलीच्या विरोधात आहे. मी ही गोष्ट काही दिवसांपासून स्पष्टपणे पाहू शकतोय. हा संघ गटबाजीत विभागला गेलाय. मला कळत नाहीये की असं का होतंय, पण जे मला दिसतंय ते खरं आहे. कदाचित विराट कोहलीचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे म्हणून असं घडत असावं”, असं शोएब अख्तर म्हणाला.

विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे
हेही वाचा: T20 WC: संघाचा मोठा विजय तरीही खेळाडूला अश्रू अनावर (Video)
“विराटने काही निर्णय चुकीचे घेतले. त्यामुळे त्याचा खेळ रंगत नाहीये. विराट अतिशय चांगला आणि प्रतिभावान खेळाडू आहे. त्यामुळे आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. न्यूझीलंडविरूद्ध भारतीय संघाने अतिशय वाईट क्रिकेट खेळलं. त्यावरून त्यांच्यावर टीका केलीच पाहिजे. त्यांचा सामना खेळण्याचा दृष्टीकोन चुकीचा होता. नाणेफेक हारताच साऱ्यांचे खांदे उतरले आणि माना खाली गेल्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणं स्वाभाविक आहे”, असंही अख्तरने स्पष्ट केलं.
Esakal