Bhaubeej 2021Gift Ideas : दिवाळीच्या सणांची वर्षभर सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. कारण दिवाळी (Diwali) हा सण प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. दिवाळीमधील फराळ आणि मिठाईचा आस्वाद घेण्यासाठी देखील कित्येकजण वाट पाहतात असतात पण, दिवाळीची आतुरतने वाट पाहण्याचे आणखी एक कारण म्हणजे भाऊबीज. प्रत्येक बहिण-भावासाठी हा सण महत्त्वाचा असतो. दिवाळीमधील या दिवशी प्रत्येक बहीण ही भावाला भेटण्यासाठी आपल्या घरी येते. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला ओवळणी म्हणून काहीतरी भेट देतो. कित्येकांना प्रश्न पडतो की, भाऊबीजेला आपल्या लाडक्या बहिणीला काय ओवाळणी द्यावी? मग काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही पर्याय सुचविणार आहोत…तुमच्या बहिणीला हे गिफ्टस् नक्की आवडतील.

चॉकलेट्स –
चॉकलेट्स हे जवळपास सर्वांनाच आवडते. तुमच्या बहिणीलाही जर चॉकलेट आवडतं असेल तर तुम्ही तिला चॉकलेट गिफ्ट करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट बाजारात मिळतील. तुमची बहिण डाएट करत असेल तर तिला डार्क चॉकलेट गिफ्ट देऊ शकता. तसेच बाजारामध्ये व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट देखील उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळ्या फ्लेवरर्सचे चॉकलेट मिळतात तेही तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.शकता.

ज्वेलरी –
मुलींना ज्वेलरी वापरायला खूप आवडते. सोने-चांदी-डायमंड- प्लॅटीनममध्ये कित्येक प्रकारच्या ज्वेलरी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला ज्वेलरी सेट, कानातले, अंगठी, चमकी- नथ, ब्रेसलेट, पेंडंट, पैंजन हे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही बहिणीला यापैकी कोणतेही ज्वेलरी गिफ्ट केली तिला नक्कीच आवडेल.
मेक-अप कीट –
मुलींना मेक-अप करायला देखील खूप आवडते. तुमच्या बहिणीला जर मेक-अपची आवडत असेल तरी तुम्ही तीला मेक-अप किट किंवा अॅक्सेसरीज भेट देऊ शकता. तुमच्या बहिणाला आवडेल आणि तिला उपयूक्त ठरेल अशी ही भेटवस्तू आहे.

वॉलेट किंवा पर्स –
तुमची बहिण लहान-मोठी कोणत्याही वयाची असली तरी तिच्यासाठी वॉलेट ही गरजेची वस्तू आहे. लेटेस्ट स्टाईलचे वॉलेट, पर्स किंवा स्लिंग बॅग देखील गिफ्ट देऊ शकता.
घड्याळ –
तुमच्या बहिणीला गिफ्ट म्हणून चांगला पर्याय उत्तम ठरेल. घड्याळ ही अशी वस्तू आहे जी प्रत्येक व्यक्तीला फायेदेशीर ठरू शकते. तुम्हाला लेटेस्ट स्टाईल वेगवेगेळ्या आकर्षक बेल्ट चे किंवा डिजीटल वॉचचे कित्येक पर्याय मिळतीलय. तुमच्या बहिणीला हे गिफ्ट नक्की आवडेल.
कपडे –
जर तुमच्या बहिणीला ट्रेडिशनल कपडे आवडत असतील तर, काही सण उत्सवात घालण्यासाठी तिला साडी किंवा ट्रेडिशनल कुर्ती गिफ्ट देऊ शकता. जर बहिणीला मॉडर्न कपडे आवडत असतील तर रोज कॉलेजला किंवा ऑफिसला वापरता येतील असे वन पिस किंवा फॅशनेबल टॉप्सही गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन देखील त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
आठवणी द्या भेट –
तुमच्या बहिणीसाठी सर्वात उत्तम गिफ्ट म्हणजे तुमच्या एकत्र घालवेल्या क्षणांच्या आठवणी. तुम्ही बहिणीला जुन्या फोटोंचे कोलाज किंवा फोटो फ्रेम आणि अशा वस्तू देखील तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला गिफ्ट करू शकता.चॉकलेट्स

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here