मुंबई – सेलिब्रेटींचे फटाक्यांच्या बॉक्सवर फोटो असणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यावर बंदी आणली गेली आहे. त्याविरोधात अनेक सेलिब्रेटींनी आपण याप्रकाराबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. आता माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर चर्चेत आली आहे. तिचे फोटो काही फटाक्यांच्या बॉक्सवर असल्याचे दिसून आले आहे. त्यानिमित्तानं मानुषीनं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे आपण पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करायची असे सांगतो. दुसरीकडे आपणच नियमांचे उल्लंघन करत असल्याची खंत तिनं व्यक्त केली आहे.
पृथ्वीराज या चित्रपटापासून मानुषीनं आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. यावेळी तिला काही वेगळं सरप्राईज द्यावं असा विचार तिच्या चाहत्यांनी केला. आणि दिवाळीच्या निमित्तानं फटाक्याच्या बॉक्सवर तिचा फोटो छापला आहे. मात्र यावर मानुषीनं नाराजी व्यक्त केली आहे. तिनं चाहत्यांना सांगितलं आहे की, आपण पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली पाहिजे. केवळ फोटो छापून ते साध्य करु शकत नाही. मोठ्यानं आवाज करणं, धूर होणारे फटाके फोडणे यानं अनेकांना त्रास होतो. आपण त्याचा बारकाईनं विचार केला पाहिजे. असं मानुषीनं म्हटलं आहे. दिवाळी जर साजरी करायची असेल तर ती फटाक्याविना साजरी केली पाहिजे. असा सल्ला तिनं फॅन्सला दिला आहे.

ही दिवाळी मानुषी तुझ्या नावे असं तिला तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. मानुषीनं सोशल मीडियावर तो फोटो शेयर केला आहे. त्याला आतापर्यत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. माझा फोटो त्या बॉक्सवर छापला त्याबद्दल चाहत्यांना धन्यवाद, पण मी फटाके वाजवणे यांचे समर्थन करु शकत नाही. मी नेहमीच पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पहिल्यांदा पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. असं मानुषीनं म्हटलं आहे.
हेही वाचा: यशराजच्या विनोदी चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर
हेही वाचा: Bandra: सलमान खान ड्युप्लेक्स फ्लॅटसाठी महिन्याला मोजतोय लाखोंचं भाडं
Esakal