India vs Afghanistan 33rd Match : पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध निर्धारित 20 षटकात 2 बाद 210 धावा केल्या आहेत. मोठ्या फरकाने उर्वरित सामने जिंकून स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्याच्या इराद्याने उतरलेल्या टीम इंडियाने सुरुवातीपासून मॅचवर पकड मिळवली. अबूधाबीच्या मैदानात पुन्हा एकदा विराट कोहलीच्या पदरी निराशा आली. अफगाणिस्तानचा कर्णधार नबीने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात तिसऱ्यांदा टॉस गमावत टीम इंडियावर पहिल्यांदा बॅटिंग करण्यात उतरली. पहिल्या दोन सामन्यातील चुका सुधारत टीम इंडिच्याच्या सलामीवीरांना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. लोकेश राहुल आणि रोहितने पहिल्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा करीमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीऐवजी रिषभ पंतला बढती देण्यात आली. त्याने 13 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 27 धावांची खेळी करत हा निर्णय योग्य ठरवला. दुसरीकडे लोकेश राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीला आला. त्यानेही 13 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या.

लोकेश राहुल 48 चेंडूत 69 धावा करुन माघारी, गुल्बदीनंने घेतली विकेट

लोकेश राहुल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी 85 चेंडूत 140 धावांची दमदार भागीदारी केली

140-1 : रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का, करीमच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी रोहितनं 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारासह कुटल्या 74 धावा

#टीम इंडियाच्या सलामीवीरांनी ‘पावर प्ले’ मध्ये 53 धावा केल्या. सुपर 12 मधील ही पाचव्या क्रमांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

#शरफुद्दीन अश्रफच्या गोलंदाजीवर राहुलच्या भात्यातून निघला टीम इंडियाच्या डावातील पहिला षटकार

#लोकेश राहुल आणि रोहित शर्माने केली टीम इंडियाच्या डावाची सुरुवात

#

Afghanistan (Playing XI): हझरतुल्लाह झझाई, मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), रहमानुल्लाह गुर्बझ, नजीबुल्लाह झारदन, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनत, गुल्बदीन नैबी, शरफुद्दीन अश्रफ, राशीद खान, नवीन उल हक, हमीद हसन.

India (Playing XI): लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here