दिवाळीत सगळीकडे खरेदीचा उत्साह बघायला मिळतो. प्रत्येकजण काही ना काही खरेदी करतच असतो. त्यातही गॅजेट म्हटलं तर लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन, स्मार्टवॉच आदी अनेक बरेच पर्याय आपल्यासमोर असतात. त्यापैकी यंदा ‘टॅब’ खरेदी करण्याचा चांगला पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे नोकियाने नुकताच आपला पहिलावहिला टॅब नोकिया टी-20 भारतात लाँच केला. जवळपास १५ ते १६ हजार रुपये किंमत असलेल्या या टॅबची खरी स्पर्धा सॅमसंग गॅलक्सी टॅब ए7 आणि रिअलमी पॅडशी असणार आहे.

नोकियाच्या टॅब टी-20 मध्ये 2K रिझोल्युशन आणि 400 नीट्ससह 10.4″ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. 3GB व 4GB रॅम तसेच 32GB व 64GB स्टोरेजसह आलेल्या या टॅबमध्ये 12nm Unisoc T610 प्रोसेसर देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या 512GB पर्यंत स्टोरेज एक्सटेंड करता येते. कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर या टॅबमध्ये LED फ्लॅशसह 8MP चा रिअर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. नोकियाच्या या टॅबचे खास वैशिष्ट्य म्हणजे 8200 mAh बॅटरी. परंतु सोबतीला दिलेले 10Wचे चार्जर हव्या तेवढ्या वेगाने चार्जिंग करण्यासाठी पुरेसे नाही. त्यासोबतच या टॅबमध्ये अँड्रॉइड 11ची ऑपरेटिंग सिस्टीम, 4G नेटवर्क, ब्ल्यूटूथ 5.0, 3.5mm ऑडिओ जॅक, स्टेरिओ स्पीकर्स, ड्युएल मायक्रोफोन आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.

स्पर्धा

रिअलमी आणि सॅमसंगशी

नुकत्याच लाँच झालेल्या नोकिया टॅब टी-20ची स्पर्धा ही याच प्राईस सेगमेंटमधील रिअलमी आणि सॅमसंगच्या टॅबशी असणार आहे. नोकियाच्या तुलनेत रिअलमी टॅबमध्ये मीडियाटेक हेलिओ G80 हे खास गेमिंग प्रोसेसर, तर सॅमसंग गॅलक्सी टॅब A7 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आले आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here