जगातील बहुतांश देश कोरोनामुळं संकटात सापडले आहेत. संसर्ग टाळण्यासाठी लोक त्यांच्या घरात बंदिस्त आहेत. अलीकडं काही देशांत लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. मात्र, जगात असे काही देश आहेत, ज्यांनी कोरोनाला त्यांच्या देशात पोहोचू दिलं नाही. आतापर्यंत ‘या’ देशांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

किरिबाती (Kiribati) : किरिबाती प्रजासत्ताक हा मध्य उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील एक बेट देश आहे. ज्याची लोकसंख्या सुमारे 1 लाख इतकी आहे. हा 32 प्रवाळांचा बनलेला देश आहे. हा देश 35,00,000 चौरस किलोमीटरवर पसरलेला आहे. स्थानिक सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
मायक्रोनेशिया (Federated States of Micronesia) : पश्चिम पॅसिफिक महासागरात वसलेल्या मायक्रोनेशिया या बेट देशात आतापर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मायक्रोनेशियाला 1986 मध्ये अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळालं. त्याचं एकूण क्षेत्रफळ 702 चौरस किलोमीटर आहे आणि हा देश 607 लहान बेटांनी बनलेला आहे.
वानूआतू (Vanuatu) : दक्षिण पॅसिफिकमधील उष्णकटिबंधीय बेट देश वानूआतूमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून गेल्या महिन्याच्या अखेरीस इथं लॉकडाऊन करण्यात आला होता. सीमा बंद झाल्यामुळं इथं कोविडचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
तुवालू (Tuvalu) : तुवालू हा पॅसिफिक महासागरात स्थित असलेला पॉलिनेशियन बेट देश आहे. येथील एकूण लोकसंख्या केवळ 12,373 इतकी असून 26 चौरस किलोमीटरच्या त्रिज्यामध्ये पसरलेला हा जगातील चौथा सर्वात लहान देश आहे. आतापर्यंत इथं कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
तुर्कमेनिस्तान (Turkmenistan) : तुर्कमेनिस्तानच्या सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत इथं एकही रुग्ण आढळलेला नाही, असा दावा सरकारनं केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारनं ‘कोरोना’ या शब्दाच्या वापरावरही बंदी घातलीय. तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोना बोलणं आणि लिहिण्यास बंदी आहे.
सॉलोमन (Solomon Islands) : पॅसिफिक महासागरातील सॉलोमन द्वीपसमूह हा पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेस सुमारे एक हजार बेटात वसलेला देश आहे. सुमारे 28,400 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या देशाची राजधानी होनिअरा आहे, जी ग्वाडलकॅनाल बेटावर आहे. आतापर्यंत इथं संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नाही.
नाउरू (Nauru) : दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला नाउरू हा बेट देश जगातील सर्वात लहान प्रजासत्ताक आहे. हा देश आतापर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचला आहे. याचं अधिकृत नाव Republic of Nauru असं आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here