बॉलीवूडमध्ये आपल्या प्रभावी अभिनयामुळे त्या अभिनेत्रीचं नाव नेहमी घेतलं जातं. तिला तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. त्या अभिनेत्रीनं राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपली मोहोर उमटवली. आपण बोलत आहोत बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेत्री तब्बुविषयी. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयीच्या काही गोष्टी जाणून घेऊयात.

तब्बु ही नेहमीच तिच्या पर्सनल रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे.
तिला आतापर्यत़ तिच्या अभिनयामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.
तब्बुच्या हैदर, मकबूल, अस्तित्व, चांदणी बार, तक्षक, विरासत, सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
4 नोव्हेंबर 1971 रोजी हैद्राबाद येथे तब्बुचा जन्म झाला. तिचं पूर्ण नाव तबस्सुम हाश्मी असे आहे.
तब्बु आणि प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांच्या रिलेशनशिपची अनेक वर्षे चर्चा होती. ते एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र त्याला अजयनं पूर्णविराम दिला.
तब्बुचं नाव प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत देखील जोडलं गेलं होतं. त्यांनी एकमेकांना 15 वर्षे डेट केलं होतं.
तब्बुचं नागार्जुन सोबतचं नातं लग्नापर्यत काही केल्या पोहचलं नाही. याचं एक कारण म्हणजे नागार्जुनचं लग्न झालं होतं.
मात्र तब्बु नागार्जुनच्या रिलेशनबाबत एवढी सीरियस होती की, तिनं हैद्राबादमध्ये घरही घेतलं होतं.
तब्बुनं साधारण वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुटेबल बॉय नावाच्या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर इंट्री केली होती. त्यात तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here