जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं विविध देशांनी त्यांच्या शिकारीवर बंदी घातलीय. नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेले प्राणी इतके महाग आहेत, की आपण त्यांच्या किंमतीची कल्पनाही करू शकत नाही. चला जाणून घेऊया अशाच एका माशाबद्दल, जो जगात सर्वात महाग आहे.

‘अटलांटिक ब्ल्यूफिन टूना’ (Atlantic Bluefin Tuna) हा जगातील सर्वात महाग विकला जाणारा मासा आहे. नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला अटलांटिक ब्ल्यूफिन टूना पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. जगातील सर्वात महागड्या माशांचा विक्रम अटलांटिक ब्ल्यूफिन टुनाच्या नावावर आहे. हा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या माशाच्या संवर्धनासाठी दरवर्षी 2 मे रोजी ‘जागतिक टूना दिवस’ साजरा केला जातो. हा मासा वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबर 2016 मध्ये अधिकृतपणे जागतिक टूना दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: भारतातील ‘हे’ ऐतिहासिक मंदिर 70 वर्ष पाण्यात बुडालं होतं

ब्लूफिन टूना

ब्लूफिन टूना

सरकारनं रिटेनमधील अटलांटिक ब्ल्यूफिन ट्यूनाच्या शिकारीवर बंदी घातलीय. याशिवाय, हा मासा पकडल्यास तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो. जरी चुकून कोणी पकडलं, तर लगेच समुद्रात सोडावं लागेल. 23 ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीनं अनेक ब्ल्यूफिन टूना मासे एकत्रित पाहिले होते. हे इतके मासे पाहून त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. याआधीही ऑगस्ट महिन्यात टूना मासा दिसला होता. अटलांटिक ब्ल्यूफिन ट्यूना कॉर्नवॉल, इंग्लंडमध्ये 100 वर्षांपासून दिसला नाही, असं मानलं जातं. आता हा मासा उन्हाळ्यात अनेकदा पाहायला मिळतो.

हेही वाचा: जगातल्या ‘या’ देशांना कोरोनानं स्पर्शही केला नाही

ब्लूफिन टूना

ब्लूफिन टूना

या माशाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी आहेत. या माशाचा आकार ट्यूना प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे आणि तो खूप वेगाने पोहतो. नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलेला हा मासा पाणबुडीतून निघणाऱ्या टॉर्पीडो शस्त्रासारखा आहे. या आकारामुळं तो समुद्रात लांब पल्ल्यापर्यंत वेगाने पोहू शकतो. तज्ञांच्या मते, या माशाची लांबी 3 मीटर पर्यंत असू शकते आणि वजन सुमारे 250 किलो आहे. या माशामुळं मानवाला कोणतीही हानी होत नाही. हे इतर लहान मासे खातात, कारण लहान मासे हे त्याचं खाद्य आहे.

हेही वाचा: आता अफगाणिस्तानात चालणार नाहीत ‘परकीय नोटा’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here