बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी आणि अनिल कपूरची पुतणी शनाया कपूर ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिचे अनेक चाहते आहेत.

शनाया ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
ती ‘धर्मा प्रोडक्शन’मधून तिच्या बॉलिवूडच्या करिअरची सुरुवात
करणार असल्याच म्हटलं जात आहे.
याआधी ती ‘द मिसफिट वे’ च्या जाहिरातीमध्ये झळकली होती.
पण तिच्या पदार्पणापूर्वीच घराणेशाहीमुळे शनायाला ट्रोलिंगला सामोरं जाव लागत आहे.
इंस्टाग्रामवर शनायाचे लाखो चाहते आहेत. तिचे ड्रेसिंग आणि स्टाईल चाहत्यांना फार आवडते.
शनायाने ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं
तसेच ती ‘फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ या नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये झळकली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here