Bhaubeej 2021 Financial Gift Ideas: भाऊबीज (Bhaubeej ) हा सण प्रत्येक बहिण- भावासाठी (Brother-Sister) महत्त्वाचा असतो. दिवाळीतील या दिवसाची सर्वजण आतुरतने वाट पाहतात. या दिवशी बहीण ही भावाला भेटण्यासाठी आपल्या घरी येते. भावाचे औक्षण करुन आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना बहिण करते. भाऊ बहिणीला ओवळणीमध्ये छान भेटवस्तू (Gift) देतो. कित्येकांना प्रश्न पडतो की, भाऊबीजेला आपल्या लाडक्या बहिणीला काय ओवाळणी द्यावी? तुम्हाला मार्केटमधून (Market) विकत घेऊन देता येतील असे कित्येक पर्याय आहेत पण तुमच्या बहिणीसाठी खरच उपयोगी पडतील असे गिफ्ट द्यायचे असेल तर आम्ही सुचवलेले पर्याय नक्की ट्राय करा. (Financial Gift Ideas for sister on Bhaubeej)

बहिणीचे सुकन्या समृध्दी योजनेत (SSY) खाते उघडा
तुम्हाला माहित असेल की सरकारने मुलींना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सुकन्या समृध्दी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये 10 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलींचे अकाऊंट उघडता येईल. यामध्ये आई- वडील दोन मुलींचे अकाऊंट उघडू शकतात. भाऊ बीजनिमित्त तुमच्या बहिणीचे अकाऊंट उघडू शकता, या अकाऊंटमध्ये मिळणारे पैसे नंतर तुमच्या बहिणीच्या शिक्षणासाठी कामी येतील.

बहिणीचा हेल्थ इंश्योरन्स काढा
कोरोना काळात सध्या औषधांवर येणारा खर्च खूप जास्त आहे. अशात आपल्या बहिणीला औषधांच्या खर्चामध्ये तुम्ही सुरक्षा देऊ शकता. तुम्ही कोणताही आरोग्य बिमा आपल्या बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ शकताय कोरोनाच्या या काळात आपल्या बहिणीसाठी कोरोना कवच पॉलिसी देखील तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

म्युचअल फंड द्या गिफ्ट म्हणून
तुम्ही आपल्या बहिणींला आर्थिक सुरक्षा देऊ इच्छित असाल तर तिचे डिमॅट अकाऊंट उघडा आणि तिला म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला एसआयपीद्वारे म्युचअल फंडमध्ये गुंणवणूक करा. त्यामध्ये तुम्हाला कमी रिस्क असलेल्या गुंणतवणूक पर्याय मिळतीलय त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीचे भविष्य आणखी सुधारू शकता.
वर्षाभराचा मोबाईल रिचार्ज करा
या वर्षी भाऊबीजेच्या निमित्त आपल्या बहिणीच्या मोबाईलवर वर्षभराचा रिचार्ज करू शकता. हे तुमच्या बहिणीसाठी खूप चांगले गिफ्ट असेल. तसेच एक वर्षाच्या रिचार्जवर तुम्हाला खूप चांगली डिल मिळेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here